पुष्पा या गाजलेल्या चित्रपटातील सहाय्यक अभिनेता जगदीश बंडारी याला पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. पुष्पा चित्रपटात जगदिशने अल्लू अर्जुनच्या मित्राची भूमिका साकारली होती. जगदीश हा दाक्षिणात्य अभिनेता आहे. पण एका महिलेच्या आत्महत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. २९ नोव्हेंबर रोजी एका ३४ वर्षीय महिलेने आत्महत्या केली होती. मात्र या संदर्भात पोलिसांना तपास केल्यानंतर या आत्महत्येमागे जगदीश बंडारीचा हात असल्याचे पुराव्यात आढळले. जगदिशने आत्महत्या करणाऱ्या महिलेचे काही फोटो लिक करणार असल्याची धमकी दिली होती.
महिलेने यावरून हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येते.आत्महत्येला प्रवृत्त केले म्हणून पोलिसांनी कारवाई करत जगदिशला ताब्यात घेतले आहे.आत्महत्त्या करणारी महिला ही ज्युनिअर आर्टिस्ट होती. जगदीश आणि त्या ज्युनिअर आर्टिस्टचे अफेअर होते. मात्र काही कारणास्तव त्यांचे ब्रेकअप झाले. याचदरम्यान जगदिशने त्या महिलेचे काही इंटिमेंट फोटो आणि व्हिडीओज काढले होते. हे व्हिडीओ आणि फोटो लिक करण्याची जगदिशने धमकी दिली होती. त्यानंतर त्या महिलेने जगदीश विरोधात तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून जगदीश फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र पोलीसांना जगदिशचा शोध घेण्यात यश मिळाले. कलम ३०६ वरून बुधवारी त्याला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई चालू आहे. दरम्यान जगदीश हा पुष्पा २ चित्रपटातही काम करत होता.
या चित्रपटाचे शूटिंग चालू असल्याचे बोलले जाते. जगदिशला अटक करण्यात आल्यामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबले असे मिडिया माध्यमातून म्हटले जात आहे. जगदीशच्या अडचणीत वाढ झाल्याने चित्रपट निर्माते यावर वेगळा पर्याय शोधतील असेही बोलले जात आहे. पुष्पा चित्रपटामुळे जगदीश बंडारी हा ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून लोकप्रिय झाला होता. त्याने २०१९ साली चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या पाच वर्षांच्या कारकिर्दीत त्याने पाच ते सहा चित्रपट केले आहेत. पुष्पा २ या चित्रपटाव्यतिरिक्त आणखी २ चित्रपटासाठी तो काम करत होता. मात्र त्यागोदरच महिलेला आत्महत्या करण्यास भाग पाडल्या प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली आहे.