Breaking News
Home / मराठी तडका / अक्षय केळकरच्या नात्याबद्दल समृद्धीने सोडलं मौन..
akshay kelkar sister shraddha kelkar
akshay kelkar sister shraddha kelkar

अक्षय केळकरच्या नात्याबद्दल समृद्धीने सोडलं मौन..

​अक्षय केळकर हा मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा विजेता ठरला. खरं तर सुरुवातीपासूनच अक्षयवर प्रेक्षकांची नाराजी होती. महिला सदस्यांसोबत वाईट वागणुकीमुळे त्याला अनेकांनी ट्रोल केलं होतं. मात्र तरीही अक्षय फायनल पर्यंत पोहोचला आणि चौथ्या सिजनचा विजेता ठरला. विजयाची ट्रॉफी जिंकल्यानंतर अक्षयवर अभिनंदनाचा वर्षाव झाला, तर त्याच वेळी अनेक नाराज प्रेक्षकांनी त्याला ट्रोलही केलं. अखेर महेश मांजरेकर यांचा तुझ्यावर वरदहस्त आहे अशी चर्चा त्यावेळी रंगली. मात्र मी ही ट्रॉफी जिंकलो हेच अंतिम सत्य आहे असे म्हणत अक्षय ट्रोलिंगचा सामना करू लागला. काही दिवसांपूर्वीच अक्षयची बहीण श्रद्धाचा लग्नसोहळा थाटात पार पडला.

akshay kelkar sister shraddha kelkar
akshay kelkar sister shraddha kelkar

श्रद्धाच्या रुखवतात अक्षयने बिग बॉसची ट्रॉफी ठेवली होती. बिग बॉसच्या घरात जाण्याअगोदर श्रद्धाने ही ट्रॉफी जिंकून आणायची आणि माझ्या रुखवतात मांडायची असे म्हटले होते. बहिणीची ही इच्छा अक्षयने पूर्ण केली असल्याने श्रद्धा तिच्या लग्नात खूपच खुश होती. अक्षय केळकर बिग बॉसच्या घरात जाणार तेव्हापासून त्याचे नाव अभिनेत्री समृद्धी केळकर हिच्याशी जोडले जात होते. समृद्धी अक्षयची गर्लफ्रेंड आहे, तर कोणी तिला त्याची पत्नी, बहीण म्हणून ओ​​ळख देऊ लागले. अक्षयने मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या गर्लफ्रेंडबद्दल खुलासा केला होता. अक्षयची गर्लफ्रेंड कोण आहे हे त्याने गुलदस्त्यात ठेवले होते. मात्र गेल्या आठ वर्षांपासून आम्ही एकमेकांना डेट करतोय याची कबुली तो देताना दिसला. दोनदा प्रपोज करूनही अक्षयला त्याच्या गर्लफ्रेंडने नकार दिला होता.

akshay kelkar samruddhi kelkar
akshay kelkar samruddhi kelkar

मात्र कालांतराने तिचे मत बदलत गेले. यारून अक्षय समृद्धी केलकरला डेट करतोय अशी चर्चा रंगू लागली. समृद्धी आणि अक्षय एकमेकांबरोबर अनेकदा रील करताना दिसले होते. मात्र या चर्चेबद्दल प्रथमच समृद्धीने मौन सोडलेलं पहायला मिळालं. समृद्धी म्हणते की, आमच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर खूप काही लिहिलं गेलं यामुळे तर मलाच धक्का बसला होता. असे व्हिडीओ पाहिल्यानंतर तर मी कोमतच गेले होते. मला माझ्या मित्रमैत्रिणींनी तसेच नातेवाईकांनी सुद्धा याबद्दल विचारले. पण आता मी यावर मौन सोडणार आहे. अक्षय आणि मी दोघे एकमेकांना गेल्या ५ वर्षांपासून ओळखतो, तो माझा खूप चांगला मित्र आहे. मी त्याची बहीण, बायको अशी कोणीही लागत नाही. समृद्धीच्या या उत्तरानंतर आता त्यांच्यातील चर्चेला पूर्णविराम मिळेल अशी आशा आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.