Breaking News
Home / जरा हटके / ट्रोल करणाऱ्यांनी आधी हे लक्षात घ्यावं की एक बोट.. ऐश्वर्या नारकर यांचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
aishwarya narkar new look
aishwarya narkar new look

ट्रोल करणाऱ्यांनी आधी हे लक्षात घ्यावं की एक बोट.. ऐश्वर्या नारकर यांचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

ऐश्वर्या नारकर या मराठी सृष्टीत अतिशय साध्या आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून वावरल्या आहेत. बहुतेक वेळा त्यांना केसांची लांब वेणी, साडी किंवा चुडीदार ड्रेसमध्ये पाहिलेलं आहे. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरून शॉर्टस घातलेले काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. त्यावरून त्यांना अनेकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. तुम्ही छोटे कपडे घालून यंग जनरेशन समोर काय आदर्श ठेवता? म्हातार वयात हे धंदे कशाला सुचतायत? अशा अनेक विरोधी प्रतिक्रिया त्यांना मिळाल्या. ऐश्वर्या नारकर यांनी या सर्वांना सडेतोड उत्तर देताना म्हटले आहे की, मी गेल्या १८ ते २० वर्षांपासून योगा करते.

aishwarya narkar new look
aishwarya narkar new look

आता कुठे मी माझी लाइफस्टाइल लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. अशा वेळी मला गिफ्ट म्हणून दिलेली शॉर्टस मी घातली होती. त्यात मला कम्फर्टेबल वाटलं म्हणून मग मी त्यातले फोटो टाकले होते. मी आतापर्यंत कधीच शॉर्टस घातले नव्हते. कॉलेजमध्ये असताना सुद्धा मी कधी जीन्स घातली नव्हती. आता कुठे मी स्लीव्हलेस ब्लाउज घालायला लागले. मला असं वाटतं ज्याला ज्या कपड्यांमध्ये कम्फर्ट वाटू शकतं, त्याने ते कपडे घालायला काहीच हरकत नाही. अशा कमेंट्स करून आपली एनर्जी वाया घालवण्यापेक्षा आपल्याला आवडत नसेल, तर अनफॉलो करण्याचा एक ऑप्शन तुमच्याकडे असतो. किंवा आम्हाला हे नाही आवडलं असं चांगल्या शब्दात सांगू शकतो. कुठल्याही बाबतीत दुसऱ्याला ट्रोल करण्यात वेळ घालवू नका.

actress aishwarya narkar
actress aishwarya narkar

आपल्याला त्यातलं काय चांगलं घेता येईल ते पाहावं. ज्या वेळेला आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो तेव्हा ती चार बोटं आपल्याकडे असतात. आपण किती फिट आहोत हे बघणं महत्वाचं आहे. मला हे करण्यात फिजिकली छान वाटतंय त्यामुळे त्याच्यात काही आक्षेप घेतला जातो, त्यात मी वेगळं काही करतीये असं मला नाही वाटत. मला ही शॉर्टस बर्थडे गिफ्ट म्हणून मिळाले होते. मी ते फोटो पोस्ट करणारही नव्हते पण मला ते कम्फर्ट वाटले म्हणून मी ते पोस्ट केले होते. आता आयुष्यातली ५० वर्षे गेलीत, उरलेली किती हातात आहेत ते माहीत नाही. पण जे आहे त्यात आनंदी राहावं अशी माझी ईच्छा आहे. आताच्या धकाधकीच्या जीवनात स्ट्रेसफुल जीवन आपण जगतोय, मग आहे ते जीवन आपण छान जगावं असं मला वाटतं.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.