Breaking News
Home / मराठी तडका / बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर दुसऱ्या लग्नाबाबत अविष्कारने केला खुलासा
actor aavishkar darwhekar
actor aavishkar darwhekar

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर दुसऱ्या लग्नाबाबत अविष्कारने केला खुलासा

बिग बॉसच्या घरातून अविष्कार दारव्हेकर याने नुकतीच एक्झिट घेतली आहे. आता पुढच्या एलिमीनेशन मध्ये कोणता स्पर्धक घराबाहेर पडणार याची उत्सुकता आहे मात्र दरम्यान अविष्कार दारव्हेकर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच आपल्या फिटनेसला प्राधान्य देताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात जाण्याअगोदर अविष्कारने तब्बल २० किलो वजन कमी केले होते आणि आताही तो वजन कमी करून फिट राहून अभिनय क्षेत्रात पुनःपदार्पण करण्याच्या तयारीत आहे.

actor aavishkar darwhekar
actor aavishkar darwhekar

मागील काही वर्षांत अविष्कारचं वजन खूप वाढलं होत, त्याने दादर येथे स्वतःचे पाटीलज किचन नावाने फूड कॉर्नर सुरू केले आहे. त्यामुळे आवडीने खाणे आणि खायला घालणे त्याच्या आवडीचे काम होते याचाच परिणाम म्हणून त्याचे १३० किलो एवढे वजन झाले होते. त्यामुळे कुठल्याही दुकानात त्याला त्याच्या साईजची पॅन्ट मिळत नसे त्यावेळी मोठा अपमान झाल्यासारखे वाटत असे. याचवरून त्याने आपल्या फिटनेसकडे लक्ष देण्याला प्राधान्य दिले. अगदी बिग बॉसच्या घरात देखील तो नित्यनेमाने व्यायाम करताना दिसत होता या दरम्यान त्याने बरेचसे वजन कमी केले होते हे त्याच्याकडे तुमच्याही लक्षात आले असेल. बिग बॉसच्या घरात असताना गायत्री अविष्कारच्या दुसऱ्या लग्नाबाबत बोलत असते. अविष्कार याबाबत म्हणतो की आम्ही ज्या विषयावर बोलत होतो तो विषय अर्धवट दाखवला गेला खरं तर ही चर्चा माझ्या बाहेर जाण्यावर काय करणार यावर होती. बाहेर पडल्यानंतर मी सेटल होण्याला प्राधान्य देईल असे गायत्रीला म्हटले होते त्यावेळी तिने माझ्या दुसऱ्या लग्नाचा विषय काढला आणि तेव्हा अविष्कार म्हणाला होता की, बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर मी पहिले फिटनेसकडे लक्ष्य देईल आणि सेटल होईल मग पुढे जाऊन जर कधी लग्न करण्याचा विचार आलाच तर मी लग्न करेल.

aavishkar darwhekar marriage after big boss
aavishkar darwhekar marriage after big boss

अविष्कार दुसरे लग्न कधी करणार ही चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये असली तरी तो प्रथमतः अभिनय क्षेत्रात येण्याच्या पुनर्विचारात असलेला पाहायला मिळतो आहे. दरम्यान बिग बॉसच्या घरात अविष्कारचे सोनाली, विकास आणि विशाल सोबत छान बॉंडिंग जुळून आले होते. हे कलाकार अविष्कारला दादा म्हणत त्याच्याकडून सल्ला घ्यायला येत असत असं अविष्कार सांगतो. विशाल हा खूप चांगला खेळतो आणि तो पुढे जाईल अशी आशा त्याला वाटते. त्यामुळे यांची आठवण नेहमी येईल आणि पुढे जाऊन आमची मैत्री देखील राहील असं तो म्हणतो.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.