छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं या मालिकेतून सुरुची अडारकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. का रे दुरावा ही तिची सर्वात गाजलेली मालिका. सुरुचीचे बालपण आणि शिक्षण ठाण्यात झाले होते. कॉलेजचे शिक्षण झाल्यानंतर सुरुचीने मालिकांसाठी ऑडिशन देण्यास सुरुवात केली. पहचान ही दूरदर्शनवरची तिची पहिली अभिनित केलेली मालिका ठरली होती. यानंतर ती अवघाची संसार या लोकप्रिय मालिकेतून छोट्याशा भूमिकेत दिसली. पण झी मराठीच्या का रे दुरावा या मालिकेने तिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली.
अंजली, वो तो है अलबेला अशा हिंदी मराठी मालिकेत ती झळकली. बाईपण भारी देवा या चित्रपटात सुरुचीने वंदना गुप्तेच्या मुलीच्या भूमिका साकारली होती. याच चित्रपटामुळे सुरुचीला पुन्हा एकदा मालिका सृष्टीत येण्याची संधी मिळाली. सध्या सोनी मराठीवरील छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं या मालिकेतून सुरुची एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेच्या शिटिंगनिमित्त ती बराच काळ कोकणात असते. नुकतीच तिने मीडियाला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीतून तिला काही प्रश्न विचारण्यात आले ज्यांची प्रश्न तिला ताबडतोब द्यायची होती. या प्रश्नांमधुन सुरुचीच्या आवडी निवडी लक्षात आल्या. कलेची आवड होती पण अभिनय क्षेत्रात येईल असे कधी तिला मुळीच वाटले नव्हते. तुझ्याबद्दल लोकांमध्ये काही गैरसमज झालाय का?
असा प्रश्न विचारताच सुरुची म्हणते की, लोकांना वाटतं की मी खूपच इन्ट्रोव्हर्ट, अंतर्मुख आहे. जी मी फार नाहीये, म्हणजे मला थोडासा वेळ लागतो. कारण मी माझ्या माझ्या माणसांमध्ये म्हणजे माझ्या कम्फर्ट लेव्हलची जी माणसं असतात त्यांच्यात मी पटकन मिसळू शकते. पण असं नाहीये मी सगळ्या प्रकारच्या माणसांमध्ये मिसळू शकते. सुरुची अभिनय क्षेत्रात ओघानेच आली कारण तिला डान्समध्ये काहीतरी करण्याची इच्छा होती. डॉक्टर, सीए व्हायचंय असा मी कधीच विचार केलेला नव्हता. शाळेत असताना सुद्धा मी डान्सच्या आवडी निवडी जपत होते. पण संगीत अवघा रंग एकचि झाला या नाटकामुळे मला वाटू लागलं की मी या क्षेत्रात काहीतरी करू शकेन. काम असंच असावं जे तुम्हाला आवडतं म्हणून मी हे क्षेत्र करिअर म्हणून निवडलं.