Breaking News
Home / मराठी तडका / या प्रसिद्ध अभिनेत्रीने सुरू केले महाराष्ट्रीतील पारंपरिक पक्वान्नांचे हॉटेल
actress siyaa patil
actress siyaa patil

या प्रसिद्ध अभिनेत्रीने सुरू केले महाराष्ट्रीतील पारंपरिक पक्वान्नांचे हॉटेल

अभिनय क्षेत्रासोबत अनेक कलाकार मंडळी हॉटेल व्यवसायात देखील नशीब आजमावताना दिसतात. यात प्रिया बेर्डे, प्रिया मराठे, शशांक केतकर या नामवंत कलाकारांनी हॉटेल व्यवसाय सुरू केलेला पाहायला मिळाला. अशातच आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची भर पडली आहे. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना सिया पाटील हिने स्वबळावर चित्रपट सृष्टीत ओळख मिळवली. गर्भ, बोला अलख निरंजन, डोंबिवली रिटर्न, पारख नात्यांची, धूम२ धमाल, गाव थोर पुढारी चोर, चल धर पकड अशा अनेक चित्रपटातून मुख्य तर कधी सहाय्यक भूमिका तिने निभावल्या.अभिनय क्षेत्रात कार्यरत असतानाच सियाने हॉटेल क्षेत्रात येण्याचे धाडस दाखवले आहे.

actress siyaa patil
actress siyaa patil

नुकतेच मुंबईतील चांदीवली येथील स्टुडिओच्या समोर ‘ गाव curry चव महाराष्ट्राची’ या नावाने तिने हॉटेल  व्यवसाय सुरू केला आहे. तिने सुरू केलेल्या या हॉटेलमध्ये खवय्यांना पारंपरिक पदार्थांची चव चाखता येणार आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील राजेवाडी हे सिया पाटीलचे मूळ गाव. पाचवी पर्यंतचे शिक्षण स्थानिक शाळेतून घेतल्यानंतर सियाने पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले होते. एम कॉम पदवीचे शिक्षण घेण्यासोबतच तिने कम्प्युटर डिप्लोमाचे शिक्षण घेतले. कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवलेल्या सियाने खेळात देखील प्राविण्य मिळवले होते. हॉलीबॉल नॅशनल लेव्हल आणि बास्केटबॉल स्टेट लेव्हलला ती खेळली आहे. सिया पाटील ही द्राक्ष बागायतदार शंकरराव पाटील यांची कन्या आहे.

siyaa patil hotel gaon curry
siyaa patil hotel gaon curry

आटपाडी येथील साखर कारखान्याचे ते संचालक म्हणून कार्यभार सांभाळत होते, २०१० साली त्यांचे निधन झाले. सिया तिच्या बाबांसोबत खूपच कनेक्टेड होती, अगदी चित्रपटाच्या शुटिंगवेळी ती तिच्या बाबांसोबत तासंतास गप्पा मारत बसायची. त्यामुळे ही कुठल्यातरी मुलासोबत बोलत असावी अशी शंका सेटवर सगळ्यांनाच यायची. शाळेत असताना सांस्कृतिक कार्यक्रमातून सियाला डान्समध्ये नेहमी बक्षिसं मिळायची. पण आपल्याला इन्स्पेक्टर व्हायचंय या उद्देशाने ती पुन्हा आपल्या मार्गावर परतायची. कॉलेजमध्ये गेल्यावर मॉडेलिंगचे वेध लागले यातूनच काही जाहिरातींमधून झळकण्याची संधी मिळाली. पुढे नाटकात काम करण्याची संधी मिळत गेली.

यासाठी तिने घरून कुठलीही आर्थिक मदत घेतली नाही. दरम्यान आपण काहीतरी नवीन करायचं या हेतूने पुणे सातारा रोडवरील भापकर पेट्रोल पंपावर जॉब केला, दहावीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस घेतले. यातून स्वबळावर शिक्षणाचा आणि राहण्याचा खर्च भागू लागला. काही महिन्यांपूर्वी मिलेनियम पॅराडाईज, ठाकूर व्हिलेज, कांदिवली पश्चिम, मुंबई येथे तिने “S. Sense salon and spa” या नावाने सलून उभारले. तिच्या या सलूनला मराठी सेलिब्रिटी आवर्जून हजेरी लावताना दिसतात. आता सियाने मुंबई सारख्या ठिकाणी हॉटेल व्यवसाय क्षेत्रात उडी घेऊन मोठे धाडस केले आहे. तिच्या या व्यवसायाला भरभराटी येवो हीच सदिच्छा.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.