सोज्वळ चेहऱ्याची शालू दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फँड्री सिनेमामधून प्रेक्षकांना खूपच भावली. चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळवता आले नसले तरीही ग्रामीण भागातील वास्तववादी कथेतील शालूची भूमिका करणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात थोड्याच कालावधीत नावारूपाला आली. राजेश्वरी मुळची पुण्यातली, मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी संधी दिली त्यावेळी तिने चित्रपट करण्यासाठी शिक्षणामुळे नकार दिला होता. चित्रपटातील साधी भोळी शालू आणि आताच्या बिनधास्त बोल्ड अदा पाहिले की चाहत्यांना विश्वासच बसत नाही. नुकताच तिची “रेडलाईट एक विदारक सत्य” हि शॉर्ट फिल्म रिलीज होत आहे. या चित्रपटात राजेश्वरी खरात हि वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या पात्रात पाहायला मिळणार आहे. राजेश्वरीने आपल्या सोशिअल मीडियावर त्या स्त्रियांविषयी मार्मिक भाष्य केले आहे..
“तो आला, बसला, आणि गेला पण सर्वांच्या नजरा मात्र तिच्यावरच अडल्या. स्त्री ने असे काम करने योग्य नवे परंतु पुरुषाने केलेले अतिउत्तम. काही काम धंदा का करीत नाहीस, फक्त पैश्यांसाठी लाचारीचे सोंग घेतीस. पण तुम्ही तुमच्या घरात धुणे भांड्याचे तरी काम देताल का एवढेच सांगा, आणि जरी काम दिले तरी त्या मागचा हेतू हा सर्वांनाच माहिती असतो. गल्लीकडे येतांना तोंड लपवून येतात पण येतात मात्र नक्की. थोडावेळसाठी च खेळण घेतल्यासारखं आमची आबरू काढून घेता आणि मोबाईल च्या रिचार्ज पेक्षा कमी किम्मत देता. सर्वांना हे खेळणं आयुष्यात एकदातरी पाहिजे असतच पण कोणी याला कायमच आपलं करून घेण्याची हिम्मत ठेवतात का? नाही, कारण वेश्या व्यवसाय करणारी स्त्री चारित्र्यहीन असते आणि बाकीचे सर्व अगदीच पवित्र असतात. समाजात आणखी बर्याच काही गोष्टी वेश्ये बद्दल बोलल्या जातात पण कोणी मात्र कधी त्यांच्या हितात बोलत नाही, सर्वजण फक्तं ऐकुन मजा घेतात. कृपया थोडीफार दया त्यांच्यावरही करा ज्या आपल्या घरातील माता भगिनींसारखे आयुष्य कधीच जगू शकत नाहीत.”
राजेश्वरीने अशा वेगळ्या विषयाच्या चित्रपटात काम करून खूपच धाडसी निर्णय घेतला आहे. अशा चित्रपटात काम करण्याचं सहसा कोणी विचारही करत नाही, वेगळ्या धाटणीचा विषय हाताळताना समाजातील वाईट नजरांना सामोरे जावे लागते. पण तो एक अभिनय आहे आणि समाजातील प्रत्येक स्त्रीला अभिनयाच्या माध्यमांतून योग्य न्याय दिला जावा, घरातील माता भगिनींसारखे जगता यावे ह्यासाठी तिने केलेल्या या धाडसाला सुज्ञ मराठी प्रेक्षक नक्कीच साथ देतील यात शंका नाही. अभिनेत्री राजेश्वरी खरातच्या आगामी चित्रपटासाठी आणि तिने हा चित्रपट करण्यासाठी जे धाडस दाखवलं त्यात यशस्वी होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा…