अभिनेत्री किशोरी शहाणे गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून कलाक्षेत्रात काम करत आहेत. मराठी हिंदी सृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मात्र आपल्या २५ वर्षांच्या मुलाला कोणीही काम देत नाही याची खंत त्यांनी नुकतीच मोडियासमोर व्यक्त केली आहे. किशोरी शहाणे याबाबत म्हणतात की माझा मुलगा बॉबी हा लहानपणापासूनच नाटकातून काम करत आहे. आम्हाला त्याच्या अभिनयाबद्दल पूर्ण खात्री आहे की तो एक उत्तम अभिनेता होऊ शकतो. अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर तो या सृष्टीत स्वतःला सिद्ध करून दाखवेल. पण कोणीच त्याला काम द्यायला पुढे येत नाही अशी खंत त्यांनी मांडली. माझी या इंडस्ट्रीत खूप ओळख आहे अनेकजण त्याच्याशी खूप गप्पा मारतात.
सगळ्यांना तो चांगला काम करेल याचीही खात्री आहे मात्र त्यानंतर कुठेच त्याला बोलावले जात नाही. माझे पती दीपक बलराज वीज हे देखील हिंदी सृष्टीशी गेल्या अनेक वर्षांपासून जोडले गेलेले आहेत. त्यांनी अनेक कलाकारांना अभिनयाची संधी मिळवून दिली आहे. अभिनेते आणि नवखे गायक यांना त्यांनी स्टार बनवलं आहे. माझ्या मुलासाठी देखील कोणीतरी पुढाकार घ्यावा त्याला काम मिळवून द्यावे अशी आशा त्यांनी बाळगली आहे. रोनीत रॉय, बाबा सेहगल, अली असगर यांना दीपक वीज यांनी अभिनयाची संधी मिळवून दिल्यानेच ते या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करू शकले. आम्ही दोघांनी गेल्या काही दशकांपासून या क्षेत्राला योगदान दिलं.
माझी अशी ईच्छा आहे की कोणीतरी बॉबीला देखील तसा ब्रेक मिळवून द्यावा. मान्य आहे की माझी या इंडस्ट्रीत खूप ओळख आहे मोठमोठ्या निर्मात्याशी माझी चांगली ओळख आहे. आता अशाच निर्मात्यांची मी भेट घेणार असून मुलाला काम मिळवून देण्याबाबत विचारणार आहे. हिंदी सृष्टीत कलाकारांची मुलं या क्षेत्रात येतात माझ्याही मुलाला अभिनय क्षेत्रात यायचं आहे. किशोरी शहाणे या नेहमीच सोशल मीडियावर त्यांच्या मुलासोबत डान्सचे व्हिडीओ शेअर करताना दिसतात. परंतु आपला मुलगाही कलाक्षेत्रात यावा अशी मनोमन त्यांची इच्छा आहे.
माहेरची साडी, सगळीकडे बोंबाबोंब, भ्रमाचा भोपळा, शिर्डी के साई बाबा, वाजवा रे वाजवा, बाळाचे बाप ब्रह्मचारी, आयत्या घरात घरोबा, बंदिनी, दामिनी, स्वप्नांच्या पलीकडले, नवरा माझा नवसाचा, एक डाव धोबी पछाड अशा अनेक मराठी हिंदी चित्रपट तसेच मालिकांमधून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. याच अनुषंगाने आपल्या मुलानेही या क्षेत्रात यावे अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे मीडियाशी बोलताना आपल्या मुलाच्या करिअर बाबत देखील त्या तितक्याच काळजीवाहू दिसलेल्या पाहायला मिळाल्या आहेत.