Breaking News
Home / मराठी तडका / रात्रीस खेळ चाले ही मालिका सोडण्याचे अभिनेत्रीने दिले हे धक्कादायक कारण..
shevanta ratris khel chale serial
shevanta ratris khel chale serial

रात्रीस खेळ चाले ही मालिका सोडण्याचे अभिनेत्रीने दिले हे धक्कादायक कारण..

रात्रीस खेळ चाले ही मालिका अभिनेत्री अपूर्व नेमळेकर हिने सोडली असून त्यामागचे कारण खूपच धक्कादायक आहे. शेवंताच्या भूमिके मधील नाविन्य, त्या व्यक्तिरेखेतील विविध पैलू निरनिराळ्या छटा यामुळे प्रेक्षकांमध्ये शेवंता ही अजरामर झाली.खूपच स्पष्ट शब्दात तिने याचे स्पष्टीकरण दिले असून, झालेला सर्व प्रकार खूपच खेदजनक आहे. अपूर्वा म्हणते, शेवंता! बस नाम ही काफी है, पर कभी कभी मे इतना ही काफी नही होता. शेवंता म्हणून आपली ओळख आणि नंतर ते जिव्हाळ्याचे नाते या एका साध्या अपूर्वाशी जोडले गेले..

shevanta ratris khel chale serial
shevanta ratris khel chale serial

एक अभिनेत्री म्हणून मला ही भूमिका करताना खूप मजा आली आणि समाधानही वाटले खरं सांगायचं तर शेवंताचे सादरीकरण हे मला सहज जमत गेले, जणू काही मीच ती शेवंता अशी एक चेतना आजवर मी जगत आले. शेवंताची भूमिका मला खूप काही देऊन गेली असे सर्व काही छान घडत असताना, आपल्या सर्वांच्या मनात एक उत्सुकता असेल की मी शेवंताच्या भूमिकेचा का त्याग केला. असे काय घडले ज्याने मला हा प्रतिकूल निर्णय घ्यावा लागला मला माझ्या सोशल मीडियावर कमेंट मार्फत इमेल्स मधून प्रेक्षकांनी याबद्दल विचारणा केली. त्याचे उत्तर देणे ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे आणि या गोष्टीचा उलगडा करणे हे माझं कर्तव्य समजून त्याचा खुलासा करीत आहे. शेवंता या भूमिकेसाठी मी दहा किलो वजन वाढवला होतं. वजन वाढल्यावर ज्या काही निगेटिव्ह कमेंट आल्या त्या मी आजवर फेस करत आले. परंतु आता सेटवर काम करत असताना अगदी नवख्या आणि काही ज्येष्ठ कलाकारांनी विनाकारण वाढलेल्या वजनावर माझे विडंबन केले. उघडपणे माझी खिल्ली उडवली गेली. त्यात काही कमेंट्स तर मला जिव्हारी लागतील अशा जाणीवपूर्वक वारंवार केले गेल्या. त्याबद्दल वरिष्ठांनी कारवाई केल्यानंतरही संबंधित नवख्या कलाकारांनी साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही.

actress apurva nemlekar shevanta
actress apurva nemlekar shevanta

तुम्हाला माहितीच आहे की रात्रीस खेळ चालेचे शूटिंग सावंतवाडीत चालू आहे. मी मुंबईहून बारा तासाचा ट्रेन प्रवास करून जात होते. मला शूटिंग करता बोलल्यानंतर फक्त एक दिवस शूट करून नंतर तीन-चार दिवस काही शूट केलं जात नव्हतं. असं महिनाभर केवळ सहा ते सात दिवस काम मिळत होतं आणि त्याकरता मला वारंवार प्रवास करावा लागत होता. त्यात माझा संपूर्ण महिना भरतील अमूल्य वेळ वाया जात होता. प्रोडक्शन हाऊस कडून मला सांगण्यात आलं होतं की तिसऱ्या सीजन साठी तुमचे आम्हाला पाच ते सहा दिवस लागणार आहेत. म्हणून मी नकार दिल्यानंतर चॅनेल कडून मला आणखी एक शो देण्याचं आश्वासन दिलं गेलं. परंतु पाच ते सहा महिने झाले अद्याप ते आश्वासन पाळले गेले नाही त्यामुळे माझं आर्थिक नुकसान होत आहे. असाच प्रकार गेल्या वर्षी सुद्धा झी युवा वरील तुझं माझं जमतंय या मालिके वेळी घडला. मालिकेचा शेवटचा चेक मिळाला नाही म्हणून त्याबाबत चॅनलकडून एकही पैसा बुडणार नाही असं आश्वासन दिलं गेलं होतं. अद्यापपर्यंत तो चेक मिळाला नाही आणि ते आश्वासन सुद्धा पाळलं गेलं नाही.

मी अत्यंत प्रामाणिकपणे चॅनलचे एकनिष्ठ राहून काम केलं परंतु माझ्या कष्टाचा मोबदला मला मिळत नसेल आणि माझ्या प्रमाणे कष्टाची अवहेलना जीता होत असेल आम्ही नऊ च्या कलाकाराकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल अशा ठिकाणी काम करणं माझ्या तत्वात बसत नाही. त्यामुळे मी या शोमध्ये न राहण्याचा निर्णय घेतला या सर्व पार्श्वभूमीवर माझ्या जिव्हाळ्याच्या शेवंता मधून मला बाहेर पडावे लागले. दुर्दैव आहे परंतु हा सर्वस्वी माझा वैयक्तिक निर्णय आहे. आयुष्य इथे थांबले नाही आणखीन काही नवीन रोल्स मी करत राहील. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच सदैव होत राहील अशी मी आशा करते हीच माझी एकमेव प्रेरणा आहे.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.