२०२१ संपलं आणि २०२२ सुरू झालं आहे. अशात सरत्या २०२१ चा निरोप घेत, आणि नववर्षाचे स्वागत करत अनेक कलाकार मंडळी आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीबरोबर काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. अशात आपल्या सुरांनी अनेकांच्या काळजात घर करणारा गायक राहुल देशपांडेने देखील आपल्या लाडक्या मुलीबरोबर आणि पत्नी बरोबर नवीन वर्षाचे स्वागत केले आहे.
राहुलने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पत्नी नेहा आणि मुलगी रेणुका बरोबरच काही जुन्या आठवणीतले फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने कॅपशनमध्ये लिहिले आहे की, “२०२१ चा मोठा निरोप घेत २०२२ चे स्वागत. गेल्या वर्षाच्या काही आठवणी आहेत ज्या नवीन वर्षाचे छान स्वागत करतील.” अशात राहुलची आणि सर्वांची लाडकी रेणुका सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिच्या बाबा बरोबर ती अनेकदा संगीताचा रियाज करताना दिसली आहे. तसेच तिला काही वाद्य देखील उत्तम वाजवता येतात. तिचे बोबडे बोल आणि राहुल बरोबर सुरू असलेली तिची जुगलबंदी अनेकांना आवडते. तर राहुलने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये रेनुकाचा एक सिंगल फोटो देखील आहे.
जो नववर्षाच्या आगमनावेळी खूप व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये रेणुकाने गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला आहे. केसांची छोटीशी पोनी आणि कपाळावर नेहमी प्रमाणे असलेली काळी टिकली यामुळे ती आणखीनच गोंडस दिसत आहे. तिचा हा फोटो एका समुद्र किनारी पोहतानाचा आहे. तिच्या चेहऱ्यावरील हे निरागस हसू, आनंद आणि क्युटनेसने अनेकांच्या नवीन वर्षाची सुरुवात गोड झाली असल्याचे चाहत्यांनी कमेंटमध्ये सांगितले आहे. आनंदी जोशीने कमेंट करत म्हणलं आहे की, “हा फोटो पाहून खूप छान वाटलं. माझं रेणुकावर खूप प्रेम आहे.” एका चाहत्याने कमेंटमध्ये रेणुकेला “क्युट बाहुली” असं म्हणलं आहे. तर एकाने सर्वांना शुभेच्छा देत रेनुकासाठी चॉकलेटचे आणि हार्टचे ईमोजी पाठवले आहेत.