होममिनिस्टर या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर भाऊजी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. देवावर त्यांची निस्सीम श्रद्धा आहे आणि म्हणून बाप्पा आपल्याला आलेल्या संकटातून बाहेर काढतो. तो माझ्या पाठीशी आहे, अशी त्यांनी नुकतीच एक प्रतिक्रिया दिली आहे. काही वर्षांपूर्वी आदेश बांदेकर यांनी दुधीचा रस प्यायला होता. यामुळे त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. ते जगतील की नाही यांचीही खात्री डॉक्टरांना नव्हती. पण त्या दिवशी बाप्पा माझ्या पाठीशी होते आणि म्हणूनच मी या संकटातून सुखरूप बाहेर पडलो होतो असे ते सांगतात.
स्ट्रगलच्या काळात आदेश बांदेकर यांना यश मिळत नव्हते त्यावेळी ते नैराश्येत गेले होते. त्यावर्षी त्यांचा बाप्पा वडोसला होता. घरातली सगळी मंडळी झोपली होती तेव्हा मी रात्री साडे बारा वाजता बाप्पाच्या देवघरात गेलो. समईच्या प्रकाशात बाप्पा शांत बसला होता. बाप्पाकडे पाहून मी म्हणालो की, बाप्पा मी इतकी मेहनत करतोय पण काहीच घडत नाही. तू सगळं जाणतोच, त्यामुळे मी तुझ्याकडे काही मागणार नाही. पण माझ्या हातून चांगली सेवा घडू दे त्यासाठी माझ्या हातांना बळ दे. एवढे बोलून मी झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी मी मुंबईला परतलो. तेव्हा दुरदर्शनकडून मला फोन आला की अनंतचतुर्दशीच्या विसर्जनाचं निवेदन आणि व्हॉइस रेकॉर्डिंग करायचंय.
ते माझ्या आयुष्यातलं पहिलं लाईव्ह रेकॉर्डिंग होतं. म्हणून बाप्पा माझ्यासाठी खूप लकी आहे. काही दिवसांपूर्वीच आदेश बांदेकर यांचा सिम्बा नावाचा श्वान खूप आजारी पडला. त्याचं पोट खूप दुखत होतं तेव्हा लक्षात आलं की त्याच्या पोटाला पीळ पडलाय. बापटांच्या रुग्णालयात मी त्याला गाडीतून घेऊन गेलो. वैभव पवार यांनी त्याचं ऑपरेशन केलं जे बाप्पाच्या रुपात ते आम्हाला भेटले. सिम्बा आता आजारातून उपचार घेऊन सुखरूप घरी आला आणि यामुळे आम्हाला वाटतंय की आमच्या घरी बाप्पाचे आगमन अगोदरच झालेले आहे.