Breaking News
Home / मराठी तडका / एका कलाकाराचा घटस्फोट महत्वाचा वाटतो.. खाजगी आयुष्यात डोकावणाऱ्या मीडियाला अपूर्वा नेमळेकरने फटकारलं
shevanta apurva nemlekar
shevanta apurva nemlekar

एका कलाकाराचा घटस्फोट महत्वाचा वाटतो.. खाजगी आयुष्यात डोकावणाऱ्या मीडियाला अपूर्वा नेमळेकरने फटकारलं

बिग बॉसच्या शोमधून बाहेर पडल्यानंतर अपूर्वा नेमळेकर सध्या सन मराठीवरील सुंदरी या मालिकेत एका छोट्याशा पण तेवढ्याच महत्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे. बॉडिशेमिंगमुळे ट्रोल झालेल्या अपूर्वामध्ये आता कमालीचे ट्रान्सफॉर्मेशन झालेले पाहायला मिळत आहे. मात्र आता तिला ट्रोलिंगमुळे नाही तर तिच्या खाजगी आयुष्यातील गोष्टींमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अपूर्वा नेमळेकरचा घटस्फोट झालाय हे बहुतेकांना माहित आहेच. रोहन देशपांडे सोबत अपूर्वाचे लग्न झाले होते, मात्र काही कारणास्तव त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

apurva nemlekar
apurva nemlekar

रोहन देशपांडे हा राजकीय क्षेत्राशी निगडित आहे. पण काही दिवसांपूर्वीच अशी बातमी प्रसिद्ध न्यूज चॅनलवर पोस्ट करण्यात आली होती. ही बातमी वाचून अपूर्वाने त्या न्यूज चॅनललाच फटकारलेले पाहायला मिळत आहे. अण्णांच्या शेवंताचा झालाय घटस्फोट अशा आशयाचे हेडिंग असलेली ही पोस्ट अपूर्वाने पाहिली. तेव्हा तिने या बातमीचा चांगलाच समाचार घेतलेला पाहायला मिळाला. इंस्टा स्टोरीवर अपूर्वाने ह्या बातमीचा समाचार घेत म्हटले आहे की, ‘वाह अभिनंदन, महाराष्ट्रात एवढे महत्वाचे प्रश्न आ वासून उभे आहेत. त्याला वाचा फोडणाऱ्या बातम्यांऐवजी एका कलाकाराचा घटस्फोट महत्वाचा वाटतो. आता इथून पुढे यूपीएससी एमपीएससीला हा प्रश्न असेल तर एखादा वार्ताहर कलेक्टर होईल.

nemlekar apurva
nemlekar apurva

अरे थोडी तरी बाळगा रे, टीआरपीसाठी काहीही कराल का?’ असे म्हणत अपूर्वाने माध्यमाला खडेबोल सुनावले आहेत. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी अपूर्वाने आस्क मी समथिंग सेगमेंट मध्ये चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली होती. त्यावेळी तिला तू सिंगल आहेस का? हा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा अपूर्वाने हो असे उत्तर दिले होते. मी सध्या तरी सिंगल आहे. पण मी माझ्या आयुष्यात एका खास व्यक्तीची वाट पाहत आहे असे तिने त्यात म्हटले होते. काही दिवसापूर्वीच अपूर्वाने भाऊ आणि बहीण अशा जवळच्या दोन व्यक्तींना गमावले आहे. त्यामुळे ती खूपच दुःखी झालेली आहे. खाजगी आयुष्याप्रमाणे करिअरमध्ये येणाऱ्या लहान मोठ्या संकटांना नेहमीप्रमाणे अपूर्वा खंबीरपणे सामोरी जात आहे हे विशेष.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.