बॉडी शेमिंगवरून ट्रोल होणं ह्या गोष्टी अनेक अभिनेत्रींना सहन कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे आपल्या फिटनेसकडे लक्ष देणं त्यांना खूप गरजेचं असतं. हे ट्रोलिंग सुकन्या कुलकर्णी मोने यांनाही चुकलेलं नव्हतं. सुकन्या कुलकर्णी यांना पॅरॅलीसिसचा अटॅक येऊन गेला होता. त्यादरम्यान त्यांचे वजन इतके वाढले की परिणामी त्यांना चाहत्यांनी वजन कमी करण्याचा सल्ला दिला. अखेर त्यांच्या आजारपणाचे सत्य उलगडताच प्रेक्षकांकडून त्यांना मोठी सहानुभूती मिळाली होती. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिला देखील बॉडी शेमिंग वरून अशाच ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.
एवढेच नाही तर अगदी रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या तिसऱ्या सिजनमध्ये काम करत असताना सहकलाकारानीच तिला या गोष्टीवरून नावं ठेवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे या त्रासाला कंटाळून तिने ही मालिका सोडली होती. पण कालांतराने अपूर्वा नेमळेकर हिने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली. मराठी बिग बॉसच्या चौथ्या सीजनमध्ये अपूर्वाने चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. या शोनंतर तिला राव रंभा चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली. याचदरम्यान अपूर्वाने तिच्या फिटनेसकडे लक्ष केंद्रित केले. त्याचा परिणाम आता हळूहळू दिसू लागला आहे. अपूर्वा गेल्या काही दिवसांपासून कमालीची फिट दिसू लागली आहे. चांगल्या अभिनयासोबत सुंदर दिसणं प्रेक्षकांना आवडलं आहे.
तिचं हे आश्चर्यकारक ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांना सुखद धक्काच बसला आहे. अनेकांनी रावरंभा चित्रपटातील तिच्या कामाचं कौतुकसुद्धा केलं आहे. अपूर्वा सध्या सन मराठीवरील सुंदरी या मालिकेत दमदार एन्ट्री घेत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर ती पुन्हा छोट्या पडद्याकडे वळली आहे. या मालिकेतील महत्वाच्या भूमिकेसाठी चाहत्यांकडून तिला भरभरून शुभेच्छा मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच अपूर्वाने तिच्या भावाला गमावले होते त्यानंतर काही दिवसातच तिच्या बहिणीचेही निधन झाले. या एकापाठोपाठ एक आलेल्या दुखामुळे अपूर्वा पूर्णपणे खचून गेली होती. मात्र आता स्वतःला सावरत ती पुन्हा छोट्या पडद्यावर एन्ट्री करत आहे. या नवीन भुमिकेसाठी अपूर्वाचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.