’माझिया प्रियाला प्रित कळेना’ या प्रसिध्द मालिकेमधुन नावारूपास आलेली मृणाल दुसानीस ही अभिनेत्री सध्या तीच्या वाढदिवसानिम्मित कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी म्हणजे मंगळवारी २० जूनला मृणालचा वाढदिवस होता. दरम्यान तिने तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोज इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. शिवाय तिच्या सर्व चाहत्यांचे आणि त्या खास आवडत्या व्यक्तीचे आभार मानले आहेत. चला तर जाणून घेऊया मृणालच्या आयुष्यातील हा आवडता व्यक्ती नेमका कोण आहे.

नुकतेच मृणालने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटोज चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. वाढदिवसानिमित्त मृणालवर अनेक व्यक्तींनी शुभेच्छांचा वर्षाव केला. अशातच मृणालच्या पतीने म्हणजेच नीरज मोरे याने मृणालसाठी स्ट्रॉबेरीचा चीजकेक बनवला होता. हा चीजकेक फारच सुंदर दिसत आहे. आणि त्याहून सुंदर दिसत आहे सोबत असलेली ती त्यांची छोटीशी गॉड मुलगी नुर्वी. वाढदिवसाच्या खास दिसावशी या चीझ केकचे फोटोज देखील मृणालने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. फोटोज सोबत मृणालने असं कॅप्शन लिहिलं आहे की, ”मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद, धन्यवाद नीरज तू माझ्यासाठी इतका चविष्ट केक बनवलास”. या खास क्षणांना चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद देत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मृणालने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती, तिची गोंडस मुलगी नुर्वी आणि नीरज आहेत. सोबतच तिने नुर्वीला मांडीवर घेऊन केक कट केला आहे. नुर्वी दिसायला अत्यंत गोड असून, या तिघांची क्युट फॅमिली त्यांच्या चाहत्यांना भावली आहे. मृणाल नेहमी तिच्या मुलीबरोबरचे फोटोज चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकत्याच झालेल्या तिच्या मेक्सिको ट्रिप मधील फोटो देखील खास होते. नुर्विसोबत काढलेला पहिला फोटोवर मृणाल मजेने म्हणते कि हा खूप कष्टाने काढला आहे. मृणाल दुसानीसने आत्तापर्यंत अनेक मालिकांमध्ये तसेच कार्यक्रमांमध्ये काम करून स्वतःचा ठसा उमटवला आहे. सोबतच ‘तू तिथे मि’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या कार्यक्रमांमध्ये मृणाल मुख्य भूमिकेत झळकली.