मराठी सृष्टीला आजवर अनेक देखण्या नायिका लाभलेल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे अभिनेत्री श्रुती मराठे. श्रुती मराठे तिच्या निस्सीम सौंदर्याने आजही अनेकांना भुरळ घालताना दिसते. मराठमोळी असून श्रुती मराठेने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले ते तमिळ चित्रपटातून. तमिळ चित्रपटातील बोल्ड भूमिकेमुळे मादक अभिनेत्री असा तिच्यावर एक ठपका बसवण्यात आला होता. मात्र राधा ही बावरी या पहिल्याच मराठी मालिकेने तिच्यावरचा हा ठपका पुसून काढलेला पाहायला मिळाला. त्यानंतर श्रुतीने मराठी चित्रपट, मालिकांमधून अनेक दर्जेदार भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या.

अगदी सरसेनापती हंबीरराव, रमा माधव अशा ऐतिहासिक चित्रपटातील तिच्या सालस आणि दमदार भूमिकांचेही मोठे कौतुक झाले. अशातच ती तिच्या नवनवीन फोटोशूटने प्रेक्षकांचे लक्ष्य वेधून घेण्याचा प्रयत्न करत असते. नुकतेच श्रुतीने लव्हेंडर रंगाच्या बांधणीच्या साडीत फोटोशूट केले आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर मृगांक खेर याने श्रुतीचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेले आहेत. अतिशय साध्या असणाऱ्या बांधणीच्या साडीतील श्रुतीचे हे आकर्षक फोटो चाहत्यांचेच नव्हे तर अगदी सेलिब्रिटींचेही लक्ष वेधून घेत आहेत. तीच्या या निरागस सौंदर्याने चाहत्यांना घायाळ तर केलेच पण मराठी नायकांनाही तिने आपल्या सौंदर्याची भुरळ घातलेली पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांसह सेलिब्रिटींनी तिच्या या नवीन फोटोशूटवर इतकं कोणी सुंदर असू शकतं का म्हणत छान प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आता एक शेवटचा असे म्हणत श्रुतीने तिचे आणखी काही खास फोटो इंस्टा स्टोरीवर टाकले आहेत. असीम सौंदर्याने मोहून टाकणाऱ्या श्रुतीच्या सर्वच फोटोंना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. पुण्यातील मानाच्या गणपती मिरवणुकीत अनेक कलावंतांना ढोल ताशा पथकात सामील होण्याची संधी दिली जाते. महत्वाचं म्हणजे या पथकात श्रुतीला पाहणं हे एक विशेष आकर्षण ठरत असतं. नाकात नथ, डोक्यावर लाल रंगाचा फेटा भारतीय पेहरावतली श्रुती मराठे या ढोल ताशा पथकात सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. श्रुती आता टेलिव्हिजन जगतात निर्मातीच्या भूमिकेतून जम बसवू पाहत आहे. झी मराठीवरील नवा गडी नवं राज्य या मालिकेतून श्रुतीने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. या क्षेत्रातही ती उत्तम कामगिरी करताना दिसत आहे.