बॉलिवूड चित्रपट सृष्टीप्रमाणे मराठीतही अभिनयाचा वारसा परंपरागत जपलेला पाहायला मिळतो. कलाकारांच्या एक दोन पिढ्या अभिनय क्षेत्रात वावरत असल्या तरी मराठी सृष्टीत ज्याचा अभिनय सरस असतो त्यालाच प्रेक्षकांनी स्वीकारलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे स्टार किड्स असणं हे या क्षेत्रासाठी तेवढंच पुरेसं नसतं. तर तुमच्या अभिनयाची कसब इथे गृहीत धरलीच जाते. त्यामुळे या इंडस्ट्रीत जर तुम्हाला यायचं असेल तर तुमच्याकडे तेवढं टॅलेंट असणं गरजेचं आहे. महेश मांजरेकर आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून कला क्षेत्राशी जोडले गेलेले आहे. आपल्याच चित्रपटात मेधाला अभिनेत्री म्हणून त्यांनी लॉन्च केलेले होते.
मुलगी सई, मुलगा सत्या आणि मानसकन्या गौरी इंगवले यांनीही महेश मांजरेकर यांच्या चित्रपटातून काम केलं. मेधा मांजरेकर यांच्या बॅकग्राऊंड बद्दल बोलायचं झालं तर त्यांना एक सख्खी बहीण आहे. उज्वला मुळे हे त्यांच्या बहिणीचं नाव आहे. त्या चाफेकर्स अँड उज्वला क्लासेसच्या फाउंडर सुद्धा आहेत. विले पार्ले येथे त्यांचे क्लासेस सुरू आहेत. उज्वला मुळे यांचा मुलगा म्हणजे मेधा मांजरेकर यांचा भाचा सिद्धांत मुळे हा देखील आपल्या मावशीच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात दाखल झाला. सिद्धांतला मॉडेलिंगची विशेष आवड असल्याने त्याने सुरूवातीला मॉडेलिंगमध्ये आपले नशीब आजमावले. संजय जाधव यांच्या लग्न मुबारक या चित्रपटातून त्याला अभिनयाची संधी मिळाली. यात तो प्रथमच संस्कृती बालगुडे आणि प्रार्थना बेहरे सोबत स्क्रीन शेअर करताना दिसला.
लग्न मुबारक चित्रपटात सिद्धांत दुहेरी भूमिकेत दिसला. पहिलाच चित्रपट आणि जोडीला दोन लोकप्रिय नायिका त्यामुळे सिद्धांतला त्याच्या अभिनयाची कसब दाखवण्याची संधी मिळाली होती. १९६२ द वॉर इन द हिल्स या हिंदी वेबसीरिजमध्ये सिद्धांत जवानाच्या भूमिकेत झळकला होता. सिद्धांतच्या या अनोख्या भूमिकेकेतील अभिनयासाठी खूप कौतुक झाले होते. मावशी मेधा आणि महेश मांजरेकर हे त्याच्या पाठीशी कायम उभे आहेत. पण चित्रपटातून सिद्धांतने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या असल्या तरी त्याला अजूनही या क्षेत्रात जम बसवण्यासाठी स्ट्रगल करावा लागत आहे. भविष्यात बॉलिवूड सह मराठी चित्रपटातून त्याला मुख्य भूमिका साकारायच्या आहेत. पण तशी योग्य संधी मिळाली तर मी नक्कीच ते स्वीकारेल असे सिद्धांत म्हणतो.