ऑटोग्राफ या रोमँटिक चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. यानिमित्ताने चित्रपट प्रहिल्यांदा टीव्हीवर प्रदर्शित केला जात आहे. चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने अमृता खानविलकर हिने त्या एका सहीचा किस्सा इथे सांगितला आहे. जी मला खूप काही शिकवून गेली असे ती या सहीबाबत म्हणाली होती. अमृता खानविलकर शाळेत घडलेला एक किस्सा सांगताना म्हणाली की, लहानपणी मी खूप मस्तीखोर होते. शाळेत असताना मी वर्गात खूप बोलायचे, अगदी गणिताच्या वहीतही मी चित्र काढायचे. त्यामुळे माझी टीचर मला खूप रिमार्क्स द्यायची की मी खूप बोलतीये, वह्या नीट ठेवत नाही म्हणून.
माझी ड्रॉईंग खूप छान होती, त्यामुळे मी रिमार्क्सवर वडिलांची सही करायचे. जवळपास १८ ते २० रिमार्क्स असायचे त्या सगळ्यांवर मी माझ्या वडिलांची सही करायचे. पण एका पॉइंटला त्या टिचरला शंका आली. एवढे रिमार्क्स असूनही तिचे वडील काहीच कसे बोलत नाहीत, म्हणून टिचरने वडिलांना शाळेत बोलावले होते. तेव्हा कुठले रिमार्क्स? आम्हाला ह्यातलं काहीच कसं माहीत नाही? असं म्हणून टीचरने त्यांना त्या सह्या दाखवल्या होत्या. त्यादिवशी घरी आल्यावर वडिलांनी मला काय मारलं होतं. मला त्यांनी अक्षरशः पाठीवर पुस्तक ठेवून ओनव उभं केलं होतं. हे पुस्तक जर पडलं तर आणखी एक रात्र उभं ठेवेन अशी त्यांनी तंबीच दिली होती. त्यानंतर मला त्यांची ती सही कायम आठवणीत राहिली.
वडिलांची ती सही मी कधीच विसरणार नाही. असे म्हणत अमृताने त्या सहीचा किस्सा या मुलाखतीत संगीतला. ऑटोग्राफ ही एक प्रेमकहाणी आहे. ऑटोग्राफ एक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी या चित्रपटात अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, मानसी मोघे, उर्मिला कोठारे, मंगला केंकरे प्रमुख भूमिका साकारत आहेत. चित्रपटाची कथा ही नातेसंबंध आणि आयुष्यातील आठवणींचा अनोखा दृष्टीकोन सादर केला आहे. सतीश राजवाडे यांनी अनेक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. त्यांचीच कलाकृती असलेला ऑटोग्राफ प्रेक्षकांची पसंती नक्की मिळवेल असा त्यांना विश्वास आहे. या चित्रपटासाठी अमृताने मोठी मेहनत घेतली असून तिने त्यासाठी मल्याळी भाषा शिकली आहे.