राष्ट्रवादीचे खासदार आणि मराठी चित्रपट, मालिका अभिनेते अमोल कोल्हे आणि प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर विवाहबद्ध होणार अशी बातमी सध्या सिने, राजकीय वर्तुळात रंगली आहे. या बातमीमुळे सगळीकडे आश्चर्यकारक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र यामुळे स्वतः अमोल कोल्हे यांनाच धक्का बसला आहे. त्याला कारणही तसेच आहे. एका पेपरच्या रकान्यात खासदार अमोल कोल्हे अमृता खानविलकर सोबत लग्न करणार असा मजकूर छापण्यात आला. त्या सविस्तर बातमीमध्ये पुढे असेही लिहिण्यात आले होते की, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे सध्याच्या बायकोला कंटाळले आहेत.
वाजले की बारा फेम अमृता खानविलकर हिच्या प्रमात ते पागल झाले आहेत. लवकरच पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन व अमृता खानविलकर हिच्या पहिल्या पतीला घटस्फोट देऊन दोघे विवाहबद्ध होणार असल्याचे चित्रपट क्षेत्रात बोलले जात आहे. या विवाहाचा माझ्या राजकीय कारकिर्दीवर काहीही परिणाम होणार नाही. उलट अमृताशी लग्न केल्यामुळे मी पण उपमुख्यमंत्री होऊ शकेन. कारण अमृता हे नावच लकी आहे राजकारण्यांना, असे ते म्हणाले. आता बातमीच्या ह्या मजकुरामुळे स्वतः अमोल कोल्हे यांना घाम फुटला आहे. इन्स्टग्रामवर अमोल कोल्हे यांनी पुरावा म्हणून त्या बातमीचा फोटो शेअर केला आहे. या बातमीवर अमोल कोल्हे यांना मात्र काय बोलावं हेच सुचत नव्हतं. हा पेपर कोणता आहे ठाऊक नाही, पण शेवटच्या ओळीतली क्रिएटिव्हिटी, काय बोलावं?
नशीब बायकोला आज १ एप्रिल आहे हे माहीत होतं, नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची व्यवस्था करावी लागली असती! आता अमोल कोल्हेंच्या या प्रतिक्रियेनंतर त्यांना चाहत्यांकडून मजेशीर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला ही बातमी पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. आज १ एप्रिलच्या निमित्ताने कोणी आपली अशी फिरकी घेईल याचा विचारही अमोल कोल्हे यांनी केलेला नव्हता. पण बातमीमुळे आपला इतक्या वर्षांचा संसार मोडणार नसल्याची खात्री त्यांनी इथे दिलेली पाहायला मिळाली. मात्र त्या बातमीवर दिलेले त्यांचे स्पष्टीकरण पाहून आता सगळीकडे एकच हशा पिकलेला पहायला मिळतो आहे. आता या बातमीवर अमृता खानविलकर हिची प्रतिक्रिया काय असेल याची उत्सुकता सगळ्यांना आहे.