अभिनेत्री मानसी नाईक हिने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून लग्नाचे फोटो डिलीट केले होते. एवढेच नाही तर नवरा प्रदीप खरेरा सोबतच्या प्रत्येक आठवणी आणि त्याच्या सोबत काढलेले व्हिडीओ देखील तिने हटवले होते. त्यावरुन मानसी आणि प्रदीपच्या संसारात काहीतरी बिनसलं अशी चर्चा जोर धरताना दिसली. मानसीप्रमाणे प्रदीपने देखील त्याच्या इन्स्टाग्रामवरून मानसीसोबतच्या सर्व आठवणी हटवल्या आहेत. त्यामुळे हे घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम आहेत हे स्पष्ट झालेले दिसून आले. दीड वर्षांचा त्यांचा सुखी संसार असा कोलमडल्याने मानसीला हा धक्का पचवणे थोडे कठीण जात असल्याचे दिसून येते.
या निर्णयामुळे ती आतून पूर्णपणे खचली असली तरी प्रत्यक्षात ती आपल्या चेहऱ्यावर ते दाखवून देत नाही. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने स्वामी समर्थांचा जप लिहीत आपले मन रमवण्याचा प्रयत्न केला आहे. यात लिहिलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे असे म्हणत तिने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. आज मी माझ्या मोबाईल मधल्या काही गोष्टी डिलीट करत होते. तेव्हा प्रत्येक वेळी फोन मला विचारत होता Are you sure म्हणजे नक्की ना. मला मोठे आश्चर्य वाटले की एक निर्जीव मशीन आपल्या आत साठवलेल्या आठवणी काढून टाकण्यापूर्वी तुम्हाला नक्की ना असं विचारते. मग एक जिवंत माणूस ज्याला भावना आहेत असे म्हटले जाते इतका निष्काळजी व भावनाशून्य कसा राहतो.
जो नातेसंबंध तोडण्यापूर्वी वा तोंड फिरवण्यापूर्वी स्वतःला एकदाही विचारत नाही की Are you sure नक्की ना. मानसीने शेअर केलेली ही स्टोरी खूप काही बोलून जाते. आपल्या आयुष्यात असणारी व्यक्ती आपल्याला अशी सोडून जाते त्यामुळे ती खूपच खचून गेलेली पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे काल प्रदीपचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने तिने ही स्टोरी शेअर केलेली पाहायला मिळाली. त्यामुळे मानसी आयुष्यात खूप काही वाईट घडतंय या विचाराने खचलेली वाटत आहे. लग्नानंतर एकदम कडक या चित्रपटातून ती पुन्हा आयटमसॉंग करताना दिसत आहे. त्यामुळे सध्या ती चित्रपटाच्या प्रदर्शनकडे आपले मन रमवताना दिसत आहे. प्रदीपच्या नात्याबद्दल अजूनही तिने उघडपणे काहीही बोललेले नसले तरी तिच्या पोस्टमधून काहीतरी बिनसल्याचं नक्की जाणवत आहे.