Breaking News
Home / मराठी तडका / ​बिग बॉस फेम रूचिरा जाधवने अखेर मौन सोडलं
ruchira jadhav big boss
ruchira jadhav big boss

​बिग बॉस फेम रूचिरा जाधवने अखेर मौन सोडलं

बिग बॉस मराठी ४ शोमधून बाहेर पडल्यानंतर रूचिरा जाधव हिने बॉयफ्रेंड रोहित शिंदे याला अनफॉलो केल्याची बातमी पसरली होती. यामुळे त्यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली होती. आता या प्रकरणी रूचिराने रोहितचा विषय संपला असं म्हणत स्पष्टीकरण दिलं आहे. रोहित शिंदे आणि रूचिरा जाधव हे कपल म्हणून बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाल्यापासूनच चर्चेत होते. गेल्याच आठवड्यात रूचिरा बिग बॉस शोमधून बाहेर पडली. या शोमध्ये रोहित आणि रूचिरा हे स्पर्धक म्हणून सहभागी होते. त्यांच्यातील खास नातंही अनेक क्षणांमधून लपत नव्हतं.

ruchira jadhav big boss
ruchira jadhav big boss

रूचिराने शोमधून बाहेर पडताच रोहितसोबतचं नातं संपवलं आहे. रूचिराने रोहितला अनफॉलो केल्यामुळे अशा शंकांना उधाण आलं. ऑल इज वेल म्हणत ज्या शोमध्ये ही जोडी दिसली त्या शोमधून बाहेर पडताच, ऑल इज नॉट वेल असं म्हणण्यासारखं नेमकं असं काय झालं हा प्रश्न चाहत्यांना पडला होता. रूचिराचं नॉमिनेट होणं जितकं चर्चेत आलं, त्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती घराबाहेर पडल्यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा आल्याची शंका उपस्थित करणाऱ्या एका घटनेने. ऑल इज नॉट वेल असा ट्रेंड सर्वत्र फिरत होता. पण आता रूचिराने या प्रकरणाला पूर्णविराम दिला आहे. रूचिराने असं म्हणते आहे की, माझ्या आणि रोहितच्या नात्यात कोणताही वाद नसून काही गैरसमज झालेत, जे लवकरच दूर होतील.

rohit shinde ruchira jadhav
rohit shinde ruchira jadhav

त्यामुळे काहीही तर्क लावत बसू नका. रोहित बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर सगळं काही नीट होईल. घराबाहेर पडण्यासाठी मीच जबाबदार आहे. त्यामुळे हा विषय इथेच संपला. रूचिराच्या या स्पष्टीकरणाने चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. रुचिरा आणि रोहित गेली काही वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. घरातदेखील सगळ्या स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना त्यांची जोडी आवडत होती. मागील आठवड्यात घडलेल्या काही घटनांमुळे दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात होतं. रोहितने सगळ्यांसमोर रुचिराची बाजू न घेतल्याने ती थोडी नाराज होती. तर चावडीवरही महेश मांजरेकर यांनी रोहितला या गोष्टीचा जाब विचारला होता. पण आता जे झालं ते माझ्या चुकीमुळे झालंय असं म्हणत रूचिराने या प्रकरणावर पडदा टाकला आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.