सई ताम्हणकरने स्वतःच्या बळावर मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत स्थान निर्माण केले आहे. नुकतेच मिनी फिल्मसाठी तिला फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. अर्थात या पुरस्काराने मी भुरळून गेलेली नाही तर अजून चांगलं काम करण्याची नवी ऊर्जा मिळाली आहे, असे ती आवर्जून म्हणताना दिसते. लवकरच सई ग्राउंड झिरो या चित्रपटात आणि इंडिया वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. यानिमित्ताने प्रसिद्ध आरजे सिद्धार्थ कनन याने सईची एक मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत सईने सिध्दार्थच्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिलेली पाहायला मिळाली.
सईने आपल्या पूर्वाश्रमीच्या नवऱ्याबद्दल देखील खुलासा केलेला दिसला. सई सध्या निर्माता असलेल्या अनिश जोग याला डेट करत आहे. २०१३ साली अमेय गोसावी सोबत तिने मोठ्या थाटात लग्न केले होते. लग्नानंतर अवघ्या दोन वर्षातच या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अर्थात हा निर्णय आम्ही दोघांनीही विचारपूर्वक घेतला होता, हे सई मुलाखतीत आवर्जून म्हणते. अमेय आणि तिच्या नात्याबद्दल बोलताना सईने खुलासा केला की, आताही आम्ही एकमेकांना भेटतो. एकमेकांशी बोलतो आणि तो क्षण मी शब्दात वर्णन करू शकत नाही. जेव्हा आम्ही घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात गेलो होतो. त्या दिवशी कागदपत्रांवर सही केल्यानंतर आम्ही पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला आम्ही आमच्या मित्रमंडळींना बोलावलं होतं आणि तिथेच घटस्फोटाबद्दल आम्ही जाहीर केले होते.
त्यादिवशी आम्ही खूप एन्जॉय केलं आणि भरपूर दारू प्यायलो होतो. अमेयच्या नावाचा एक टॅटू मी अजूनही तसाच जपून ठेवला आहे. या आठवणी पुसून टाकण्यात काय अर्थ आहे? आपल्या आयुष्यात अशी एक वेळ येते जे तुम्हाला चांगलं वाटतं. त्यामुळे मी आजही तो टॅटू मिरवते; असे सई बिनधास्तपणे सांगते. सईच्या म्हणण्यानुसार मी कुठलीही गोष्ट आजपर्यंत लपवून ठेवलेली नाही. तिच्या या खुलाश्यानंतर सिद्धार्थ देखील तिच्या मताचा आदर करताना दिसतो. सईने या मुलाखतीत आणखी एक खुलासा केलेला पाहायला मिळाला. सिध्दार्थने तिला रेडकार्पेटवर आलेला काही अनुभव विचारला. मी रेडकार्पेटवर एन्ट्री केली तेव्हा मीडियाने दुसरीकडे कॅमेरा फिरवला. हा झालेला माझा अपमान मी माझ्या कामातून सिद्ध करून दाखवेल असे सई तितक्याच आत्मविश्वासाने म्हणाली.