आशुतोष भाकरेने नैराश्याला कंटाळून मयुरीच्या नवऱ्याने आपले आयुष्य संपवले होते. आशुतोष भाकरे आणि मयुरी यांचे अरेंज मॅरेज होते. एका कार्यक्रमात त्या दोघांची भेट झाली होती. दोघांनी गप्पा मारल्या, मात्र त्यानंतर तो मुलगा म्हणजे आपल्याला पाहायला आलेले स्थळ होते हे तिला घरच्यांकडून समजले. त्यानंतर मयुरीने लग्न करण्यास नकार दिला होता, कारण डेंटिस्ट असलेल्या मयुरीला आपल्या करिअरवर लक्ष्य केंद्रित करायचे होते. पुन्हा एकदा आशुतोषला भेटण्यासाठी तिच्या घरच्यांनी आग्रह केल्यावर, या दुसऱ्या भेटीत तिने आशुतोषसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
चार वर्षांच्या सुखी संसारात रमलेली मयुरी आशुतोषच्या निधनाने खचून गेली होती. स्वतःला सावरत इमली या हिंदी मालिकेतून तीने कलासृष्टीत पुनरागमन केले. मयुरी सध्या आपल्या मित्रांसोबत व्हिएतनामची ट्रिप एन्जॉय करत आहे. या ट्रिपचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. त्यावरून एकाने तिला ट्रोल केलं आहे. अंग मयुरे नवरा स्वर्गवास होऊन एक वर्ष झालं नाही आणि तू फिरायला लागलीस. फोटो काढायला लागलीस, एन्जॉय करायला लागलीस. मयुरीने ही कमेंट तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर करत म्हटले आहे की, जर आपण लोकांबद्दल विशिष्ट मत तयार न करता किंवा त्यांना जज न करता जगू दिलं. तर हे जग खूप हेल्दी राहील, स्वतःचा आनंद शोधणं सामान्य असायला हवं.
काही महिन्यांपूर्वी मयुरीने लाईव्ह येऊन आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यात ती म्हणाली होती की, समाजात काही समजुती निश्चित केल्या गेल्या आहेत. जसे की पुरुष मंडळी खूप स्ट्रॉंग असतात किंवा एखादा नेता किंवा मोठी व्यक्ती खूप स्ट्रॉंग असली पाहिजे. त्यांनी रडलं नाही पाहिजे; सगळी संकटं एकट्यानेच पेलली पाहिजेत. स्ट्रॉंग बनण्याच्या या सर्व जबाबदाऱ्या अशा पुरुष मंडळींनीच सांभाळल्या पाहिजे. अशी कुठेतरी बुरसटलेली विचारसरणी आपल्या मनात बिंबवलेली पाहायला मिळते. सध्याच्या वातावरणात हे बदलणं खूप खूप गरजेचं आहे. मला ही अनेक चाहत्यांचे मेसेजेस येतात की ताई तू खूप धीराची आहेस, स्ट्रॉंग आहेस.
पण मी विचार करायचे की ही लोकं मला का स्ट्रॉंग बोलताहेत? मी तर रोज रडतीये; मला तर रोज त्रास होतोय. मी बऱ्याचदा त्याच त्याच गोष्टी माझ्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करत असते. मग मी स्ट्रॉंग कशी? पण नंतर माझ्या लक्षात आलं की हेच स्ट्रॉंग बनणं असावं. आपल्या गोष्टी दुसऱ्यांसोबत शेअर करणं हेच तुम्हाला धीर देतं असं मला वाटतं. तुमच्या आयुष्यात देखील असा एखादा व्यक्ती असावा ज्याच्यासोबत तुम्ही तुमचं मन मोकळं करू शकाल. अशी एक तरी व्यक्ती तुमच्याजवळ असावी ज्याला तुम्ही तुमच्या अडचणी, खाजगी गोष्टी सांगून मन मोकळं केलं पाहिजे.