Breaking News
Home / मालिका / खुडूक कोंबडी पिसाळली विक्या.. किरण मानेच्या खेळीवर प्रेक्षक खुश
kiran mane big boss marathi
kiran mane big boss marathi

खुडूक कोंबडी पिसाळली विक्या.. किरण मानेच्या खेळीवर प्रेक्षक खुश

मराठी बिग बॉसचा शो कालच्या टास्कमुळे आधीकच रंगलेला पाहायला मिळाला. गेल्या काही दिवसांपासून या शोमध्ये भांडणं वादावादमुळे हा शो पहायला नकोसा वाटत होता. काल बिग बॉसने दोन गटांना खुल्ला करायचा राडा हा टास्क दिला होता. किरण माने, विकास, प्रसाद जवादे यांनी हा टास्क खेळण्याचा निर्णय घेतला. हा टास्क इतका टफ होता की त्यांच्या अंगावर विरोधी टीमने टॉयलेटचा कचरा, शॅम्पू, साबणाचा फेस असे मिळेल ते अंगावर टाकला. कमजोर सदस्य असूनही विकास हे आव्हान तितक्याच ताकदीने पेलत होता.

kiran mane big boss marathi
kiran mane big boss marathi

एका क्षणाला तर विकास पाण्याचा वापर केल्यामुळे थरथर कापत होता. परंतु अशा वेळी किरणने विकासला प्रोत्साहन देत त्याला जागेवर राहण्यास सांगितले. अपूर्वा नेमळेकर, स्नेहलता वसईकर या तर त्या दोघांना उठवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत होत्या. मात्र त्यांचे प्रयत्न पाहून किरण मानेने खुडूक कोंबडी पिसाळली विक्या असे म्हणत त्यांना अधिकच चिडवण्याचा प्रयत्न केला. प्रसाद जवादे आणि अमृताने देखील हा टास्क उत्तम निभावला. बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनमध्ये असा टास्क खेळण्यात आला. त्यावेळी पराग कान्हेरेला आपला राग अनावर झाला होता. आणि त्याने नेहा शितोळेच्या कानाखाली वाजवली होती.

snehalata vasaikar apurva nemlekar big boss
snehalata vasaikar apurva nemlekar big boss

त्यावेळी बिग बॉसच्या घरातून परागला बाहेर काढण्यात आले होते. मात्र कालचा टास्क पाहून किरण माने यांच्या संयमावर पराग खुश झालेला पाहायला मिळाला. त्यांच्या खेळीचं परागने कौतुक करत या संयमासाठी किरणच्या १०० चुका माफ असे म्हटले आहे. केवळ परागच नाही तर या शो पाहणाऱ्या प्रेक्षकांनी देखील किरणचं आणि विकासचं कौतुक केलं आहे. हे दोघेही अपूर्वाला तगडी फाईट देताना दिसल्याने आज होणाऱ्या टास्कमध्ये अपूर्वा त्यांना कशी टक्कर देते याची उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या तर त्यांच्याच खेळाची जास्त चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.