Breaking News
Home / मराठी तडका / अक्षयाच्या लग्नातल्या साड्या आहेत खूपच खास.. पहा साड्यांची खास झलक
akshaya wedding saree
akshaya wedding saree

अक्षयाच्या लग्नातल्या साड्या आहेत खूपच खास.. पहा साड्यांची खास झलक

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्या लग्नाचा थाट पाहण्यासाठी सर्वच जण खूप उत्सुक आहेत. या दोघांच्या लग्नाची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी आपापल्या मित्र मैत्रिणींच्या घरी केळवण साजरे केले होते. अक्षयाने पॉंडेचेरीला जाऊन जिवलग मैत्रिणींसोबत ट्रिप एन्जॉय केली. तिथेच तिने बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते. त्यामुळे त्यांचं लग्न लवकरच होणार अशी चर्चा रंगली होती. आता त्यांची लग्नघटिका जवळच येऊन ठेपलेली पाहायला मिळत आहे.

akshaya wedding saree
akshaya wedding saree

नुकतेच अक्षया आणि हार्दिक आपल्या कुटुंबीय तसेच जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत एका खास सोहळ्यासाठी एकत्रित जमले होते. हा सोहळा होता साड्या विणण्याचा. अक्षया आपल्या लग्नात ज्या साड्या नेसणार आहे; त्या साड्या तिच्यासाठी खूपच खास तयार होणार आहेत. कारण ह्या साड्या जिथे विणल्या जाणार आहेत, त्या ठिकाणी जाऊन ही मंडळी एकत्रित जमली. प्रत्येकाकडून तिने हातमागावर तयार होणाऱ्या साड्यांचे काही धागे विणून घेतले. पुण्यातील गुडलक कॅफेजवळ सौदामिनी हँडलूम यांच्याकडे लग्नासाठी खास साड्या तयार केल्या जात आहेत. लग्नात आपण ज्या साड्या नेसणार आहोत त्यामध्ये आपल्या जवळच्या व्यक्तींचे प्रेम असावे, असा अक्षयाचा अट्टाहास होता. म्हणून हा सोहळा तिने आयोजित केला होता.

akshaya hardeek wedding
akshaya hardeek wedding

अमोल नाईक, वीणा जगताप, मैत्रिणी, नातेवाईक यांनी खास उपस्थिती लावली होती. विणकाम करणारे कारागीर त्यांना या कामात मदत करताना दिसले. हार्दिकने देखील अक्षयाच्या साडीचे काही धागे धागे हातमागावर विणलेला पाहायला मिळाले. वीणा जगताप हिने अगोदरच याच आशयाची गोष्ट शेअर केली होती. आपण ह्या आगळ्या वेगळ्या सोहळ्याला उपस्थित होतो याची आठवण सांगितली. अक्षयाच्या या व्हिडीओत तुम्हाला तिच्या साड्यांची झलक पाहायला मिळत आहे. लाल रंगांची पैठणी तसेच आणखी काही भरजरी साड्या ती आपल्या लग्नात नेसणार असल्याचे स्पष्ट होते. अक्षया लग्नात कशी नटणार आहे याची आता अधिक उत्सुकता आहे. त्यामुळे अक्षया आणि हार्दिकच्या लग्न घटिकेकडे साऱ्यांचे लक्ष्य लागून आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.