कलर्स मराठी वाहिनीवरील हे मन बावरे या मालिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. मृणाल दुसानिस आणि शशांक केतकर या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकले होते. या मालिकेतील मुख्य पात्रांसोबत सहाय्यक पात्र देखील आजही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली आहेत. अनुची खास मैत्रीण नेहाची भूमिका अभिनेत्री सायली परब हिने सहजसुंदर अभिनयाने गाजवली होती. मालिकेतल्या या दोघी मैत्रिणी खऱ्या आयुष्यातही मैत्री जपताना पाहायला मिळाल्या. मृणाल दुसानिस हिला कन्यारत्न प्राप्ती झाली, तेव्हा काही दिवसातच सायलीला देखील पुत्ररत्न प्राप्ती झाली होती.
त्यामुळे या दोघींनीही आपल्या आयुष्यात जवळजवळ मातृत्वाचा अनुभव घेतलेला पाहायला मिळाला. २०२० साली सायलीने इंद्रनील शेलार सोबत लग्नगाठ बांधली होती. १९ ऑगस्ट रोजी या दोघांना पुत्ररत्न प्राप्ती झाली. आज या दोघांनी आपल्या लेकाचं बारसं मोठ्या थाटात साजरं केलेलं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी आपल्या लेकाचं नाव ‘कबीर’ ठेवल्याचे जाहीर केले. कबीर हे महान व्यक्ती म्हणून मानलं जातं या नावातच सामर्थ्य असल्याने सामर्थ्यवान मुलगा अशी त्याला ओळख मिळते. सायली परब हिने कॉलेजमध्ये असल्यापासूनच रंगभूमीवर पाऊल टाकले होते. नाटकातून काम करत असताना सायलीला झी मराठीच्या चूक भूल द्यावी घ्यावी मालिकेतून झळकण्याची नामी संधी मिळाली.
नळीची भूमिका गाजवल्यानंतर सायली हुतात्मा वेबसिरीज मधूनही झळकली. तू सौभाग्यवती हो या मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर सायलीने मातृत्वाची चाहूल लागताच अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. मालिकेमधून ती जाण्याने रसिक प्रेक्षकांनी खंत व्यक्त केली होती. अजून काही दिवस तरी कबिरच्या पालनपोषणाची जबाबदारी आल्याने ती कुठलाच नवीन प्रोजेक्ट स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या गोड बातमीसाठी सायली परब आणि इंद्रनील शेलार यांचे खूप खूप अभिनंदन.