Breaking News
Home / मराठी तडका / मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा साखरपुडा संपन्न.. या कलाकारासोबत करणार लवकरच लग्न
bhagyashree mote engagement
bhagyashree mote engagement

मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा साखरपुडा संपन्न.. या कलाकारासोबत करणार लवकरच लग्न

मराठी मालिका सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा काल ९ ऑक्टोबर २०२२ रोजी रविवारी मोठ्या थाटात साखरपुडा संपन्न झाला. बॉयफ्रेंड विजय पालांडे ह्याच्यासोबत भाग्यश्री रिलेशनमध्ये होती. दोघांनी एकमेकांवर असलेल्या प्रेमाची जाहीरपणे कबुली दिली होती. भाग्यश्रीचा वाढदिवस हटके अंदाजात साजरा करून विजयने तिला एक खास सरप्राईज दिले होते. देवयानी या गाजलेल्या मालिकेत भाग्यश्रीने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. ही तिने अभिनित केलेली पहिली मराठी मालिका होती. या मालिकेमुळे भाग्यश्री प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती.

bhagyashree mote engagement
bhagyashree mote engagement

काय रे रासकला, पाटील, मुंबई मिरर, माझ्या बायकोचा प्रियकर अशा चित्रपटातून भाग्यश्री महत्वपूर्ण भूमिकेत झलकली आहे. तिने काही दाक्षिणात्य चित्रपटात देखील आपले नशीब आजमावले आहे. मराठी मालिका आणि चित्रपटातून काम करत असताना भाग्यश्रीने हिंदी मालिकेत देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या. सिया के राम, देवो के देव महादेव अशा हिंदी मालिका तिने गाजवल्या आहेत. छोट्या पडद्यावर काम करत असताना भाग्यश्री भवाई या हिंदी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली आहे. झी फाईव्हवर या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. भाग्यश्री आणि विजय पालांडे हे दोघेही साखरपुड्या नंतर लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जाते.

bhagyashree mote vijay palande
bhagyashree mote vijay palande

विजय पालांडे हा देखील मराठी तसेच बॉलिवूड सृष्टीत कार्यरत आहे. मेकअप डिझायनर म्हणून त्याने अनेक बॉलिवूड चित्रपटासाठी काम केलेले आहे. याच क्षेत्रात काम करत असताना भाग्यश्रीसोबत त्याची ओळख झाली, आणि या ओळखीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. मराठी सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींना या दोघांच्या प्रेमाची खबर लागली होती. मात्र हे दोघेही आपल्या प्रेमाची जाहीरपणे कबुली कधी देतात याचीच ते वाट पाहत होते. जेव्हा या दोघांनी ही बाब जाहीर केली त्यावेळी भाग्यश्रीच्या चाहत्यांनी आमची मनं तुटली असल्याचे मिश्कीलपणे म्हटले होते. आता थाटात पार पडलेल्या साखरपुड्या नंतर भाग्यश्री आणि विजयवर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.