Breaking News
Home / ठळक बातम्या / प्रिया बेर्डे आणि अलका कुबल यांच्या अडचणीत वाढ.. १० लाख दंड भरावा लागणार
priya berde vijay patkar alka kubal
priya berde vijay patkar alka kubal

प्रिया बेर्डे आणि अलका कुबल यांच्या अडचणीत वाढ.. १० लाख दंड भरावा लागणार

मराठी चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त मानाचा मुजरा हा तीन दिवसीय कार्यक्रम कोल्हापूर येथे मराठी चित्रपट महामंडळातर्फे कोल्हापूर येथे २०१५ मध्ये पार पडला होता. या कार्यक्रमात बोगस खर्च केला असल्याचे अहवालात दाखवण्यात आले होते. या १० लाख रुपयांच्या वाढीव खर्चा विरुध्द काही महामंडळ सदस्यांनी कोल्हापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली होती. विजय पाटकर, प्रिया बेर्डे, अलका कुबल त्यावेळी संचालक पदी कार्यरत होते. तक्रारीनंतर या खर्चाची भरपाई करण्याचा आदेश सहआयुक्तांनी जानेवारी २०१९ मध्ये दिला होता. मात्र या निर्णयानंतर संबंधित संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

alka kubal priya berde vijay patkar
alka kubal priya berde vijay patkar

ही मागणी फेटाळून लावत न्यायालयाने ही वाढीव रक्कम सहा आठवड्यात भरण्याचे आदेश दिले आहेत. मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, विजय कोंडके, विजय पाटकर, प्रिया बेर्डे, अलका कुबल, मिलिंद अष्टेकर, सतीश बिडकर. तसेच सुभाष भुरके, इम्तियाज बारगिर, सदानंद सूर्यवंशी अशा अनेक जणांवर हा वाढीव खर्चाचा भार पडला. या सर्वांना ही रक्कम सहा आठवड्यात भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मानाचा मुजरा हा कार्यक्रम २०१५ साली पार पडला होता. या कार्यक्रमात हा आर्थिक घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले होते. या काळात १० लाख रुपये विनाकारण खर्च झाला असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे होते. या कालावधीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार भास्कर जाधव, प्रमोद शिंदे, रणजित जाधव यांनी धर्मदाय आयुक्तांकडे केली होती.

priya berde vijay patkar alka kubal
priya berde vijay patkar alka kubal

यावर निर्णय देत १० लाख ७८ हजार ५९३ रुपये ही रक्कम न्यासाच्या खात्यामधून भरावी असे नमूद करण्यात आले होते. टंकलेखनात झालेल्या या एका शब्दाच्या चुकीमुळे हे पैसे खात्यातूनच भरण्यास सांगितल्याने ते आजवर भरण्यात आले नव्हते. त्याविरोधात महामंडळातर्फे २०१९ साली पुन्हा एकदा दाद मागण्यात आली होती. या तक्रारींवर तोडगा निघाला असून आता ही रक्कम या सहभागी सदस्यांना भरावी लागणार असल्याने त्यांच्याकडे आता कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला दिसत नाही. उच्च न्यायालयाने देखील त्यांनी दिलेली याचिका फेटाळली असल्याने या सदस्यांना ही रक्कम सहा आठवड्यात जमा करावी लागणार आहे. त्यामुळे प्रिया बेर्डे, अलका कुबल, विजय पाटकर यांच्यासह अनेक सदस्य अडचणीत सापडले आहेत.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.