रंग माझा वेगळा या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे परंतु मालिकेच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. मालिकेतील कार्तिकी म्हणजेच बालकलाकार साइशा भोईर हिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. साइशाने मालिका सोडली असल्याने प्रेक्षकांनी यावर नाराजी दर्शवली आहे. कार्तिकीची भूमिका साइशाने उत्तम साकारली होती ही भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली होती. त्यामुळे चाहत्यांचे साइशावर प्रचंड प्रेम होते. मात्र आता ती या मालिकेचा भाग नसणार हे प्रेक्षकांसाठी नाराजीचे कारण ठरले आहे. त्यामुळे आता ईथुनपुढे मालिकेत कार्तिकीची भूमिका कोण साकारणार याची प्रतीक्षा आहे. साइशा भोईर हिने आपल्या अभिनयाने कार्तिकीची भूमिका प्रचंड गाजवली होती.
त्यामुळे ती ही मालिका का सोडतीये असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. साइशा आणि तिच्या आईवडिलांनी सोशल मीडियावर याचे कारण सांगितले आहे. रंग माझा वेगळा या मालिकेत कार्तिकीचा रोल जास्त होता स्क्रीनवर ती जास्त दिसायची. परंतु आता साइशाची शाळा सुरू झाली आहे. आणि म्हणूनच ती आपल्या शाळेला खूप मिस करत आहव. शाळेत जाता यावं म्हणून साइशाने मालिकेतून काढता पाय घेतला आहे. सोबतच मालिका सोडण्याची आणखी बरीच कारणं यावेळी तिच्या आईवडिलांनी दिलेली आहेत. गेल्या काही भागांपासून तिचा रोल महत्वाचा होता, इतर कलाकारांच्या तुलनेने साइशाला जास्त काम होते. त्यामुळे मालिकेचे शूटिंग रात्री ९ ते १० वाजेपर्यंत चालायचे त्यानंतर तिचे पॅकअप होत होते.
घरापासून शूटिंगला जाण्यासाठी २ ते ३ तास जायचे त्यानंतर १० ते १२ तास शूटिंग करावे लागायचे. गेल्या वर्षी साइशा पहिली इयत्तेत शिकत होती मात्र आता ती दुसरीत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय साइशाला शाळा खूप आवडते त्यामुळे ती शाळेला खूप मिस करतीये. साइशाची देखील शाळेत जाण्याची ईच्छा होती. सततच्या शुटिंगमूळे ती नाराज होती मग अशा परिस्थितीत तिच्या निर्णयाचा विचार केला. कार्तिकीच्या भूमिकेने तिला मोठी लोकप्रियता मिळाली पण त्याअगोदर ती साइशा म्हणून सोशल मीडियावर चांगली प्रसिद्धी झाली. पुढेही ती तुमच्या भेटीला येत राहणार आहे आणि महिन्यातून दोनदा तिचे लाईव्ह सेशन केले जाईल जेणेकरून चाहत्यांशी तिला संवाद साधता येईल.
साइशाला स्वतःला शाळेत जायला खूप आवडते ती स्वतः म्हणते की ‘मला शूटिंग फारस आवडत नाही, माझ्या शाळेतली क्लास टीचर माझी मालिका पाहते त्यामुळे त्या मला खूप चांगलं समजून घेतात’. सइशाला शाळेने सुद्धा खूप सपोर्ट केला आहे. गेल्या दहा महिन्यापासून साइशा शुटींगध्ये व्यस्त होती त्यामुळे तिचा ऑनलाइन अभ्यास चालू असायचा, परंतु शाळेच्या स्पोर्टमुळे तिच्या नोट्स घरापर्यंत पोहोचायच्या. साईशाला आता आपलं बालपण जगायचं आहे शाळेतला अनुभव घ्यायच आहे. त्याचमुळे साइशाने स्वतः ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु तिच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी अशी आहे की लवकरच साइशा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
साईशाने अभिनित केलेला चित्रपट लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल. पुढेही आणखी बरेच प्रोजेक्टस साईशाला मिळाले आहेत ,खूप मोठमोठ्या संधी तिच्याकडे चालून आल्या आहेत. मालिकेच्या प्रेक्षकांना आठवत असेल साइशा अगोदर बोबडे बोलायची पण आता जसजशी ती मालिकेतून पुढे आली तिच्या बोलण्यात सुधारणा झालेली जाणवते. ती जिथे जाईल तिथे नक्कीच तिचे नाव कमावणार अशी खात्री तिच्या पालकांना आहे. साइशाच्या नसण्याने मालिकेचे प्रेक्षक निश्चितच नाराज होणार आहेत मात्र तिच्या या निर्णयाचे स्वागत देखील या प्रेक्षकांनी केलेले पाहायला मिळत आहे.