Breaking News
Home / मराठी तडका / सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील अभिनेत्रीला दुखापत..
actress akshaya naik
actress akshaya naik

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील अभिनेत्रीला दुखापत..

कलाकारांनी मालिकांमधून ब्रेक घेतल्यामुळे मूळ कथानकात थोडाफार बदल करून ट्विस्ट आणले जातात. परंतु गेल्या काही दिवसांपासून मुख्य अभिनेत्रीच मालिकेतून ब्रेक घेताना पाहायला मिळाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रार्थना बेहरेने माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून ब्रेक घेतला होता. लंडन येथे सोनाली कुलकर्णीचा विवाह संपन्न झाला होता तिच्या लग्नाला हजेरी लावता यावी म्हणून हा तात्पुरता ब्रेक तिने घेतला मात्र तिथे जाऊनही प्रार्थना शूट करून मालिकेत सक्रिय झाली होती. तर हृता दुर्गुळे हिने देखील मन उडू उडू झालं या मालिकेतून ब्रेक घेतला होता. १८ मे रोजी प्रतीक शाह सोबत हृता विवाहबद्ध झाली होती.

actress akshaya naik
actress akshaya naik

त्यावेळी मालिकेत बदल करून दीपिका कोमामध्ये गेली असल्याचे दाखवण्यात आले होते. हे तात्पुरत्या स्वरूपाचे बदल मालिकेतून घडून आलेले पाहायला मिळतात. आता अशातच सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील मुख्य नायिका लतिका म्हणजेच अक्षया नाईक मालिकेतून ब्रेक घेत आहे. साधारण सात ते आठ दिवसांपूर्वी अक्षया नाईक तोल जाऊन पडली होती त्यामुळे तिच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे अक्षया सेटवर कोणाची ना कोणाची तरी मदत घेऊन शूटिंग पूर्ण करायची. लंगडत शूटिंगला पोहोचण्याचा एक व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. पाय दुखत असतानाही द शो मस्ट गो व असे म्हणत तिने मालिकेचे शूटिंग पूर्ण केले होते.

akshaya naik
akshaya naik

मात्र ही दुखापत आता अधिक वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून खूप त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे अक्षयाला आराम करण्याची गरज आहे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लिगामेंट टिअर असल्यामुळे अक्षया सेटवर व्हीलचेअरवर बसूनच शूटिंग पूर्ण करत आहे. महत्वाचं म्हणजे दुखापतीमुळे कथानकात बदल करण्यात आला आहे. आता बहुतेक सर्वच मालिकांमधून वटपौर्णिमा साजरी केली जात आहे. मात्र सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेची वटपौर्णिमा काही खास असणार आहे. लतीकाच्या ऐवजी अभ्या ही वटपौर्णिमा साजरी करणार आहे. आराम मिळावा म्हणून काही दिवसांसाठी अक्षयाला या मालिकेतून ब्रेक देण्यात आला, त्यामुळे आता लतिका तुरळक दिसणार आहे.

द शो मस्ट गो ऑन असं सगळेच बोलतो पण जीवपेक्षा मोठं दुसरं काही नाही. असे सांगत मालिकेतून विश्रांती मिळाल्याने अक्षयाने कलर्स मराठी वाहिनीचे आभार मानले आहेत. सध्या आराम हाच एक उपाय असल्याने कथेत बदल केला असला तरी मी मालिकेतून दिसणार आहे असे अक्षया म्हणते. अक्षया या दुखापतीतून लवकरात लवकर रिकव्हर होऊन मालिकेत सक्रिय व्हावी अशी तिच्या चाहत्यांची ईच्छा आहे. अक्षयाला तिच्या मित्र मैत्रिणींनी देखील काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. आराम मिळाल्यानंतर पुढील काही दिवसात अक्षया या दुखापतीतून ठणठणीत बरी होऊन मालिकेत सक्रिय होईल अशी अपेक्षा आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.