मराठी सृष्टीतील सोज्वळ अभिनेत्री म्हणून मृणाल दुसानिस हिच्याकडे पाहिले जाते. माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. तू तिथे मी ही आणखी एक तिने अभिनित केलेली मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. हे मन बावरे या मालिकेनंतर मृणाल तिच्या नवऱ्यासोबत परदेशात राहू लागली. प्रेग्नंन्ट असल्याची बातमी तिने सोशल मीडियावर जाहीर केली होती. २४ मार्च २०२२ रोजी मृणाल आणि निरजला कन्यारत्न प्राप्ती झाली. आपल्या मुलीचे नाव तीने नूरवी ठेवले असल्याचे जाहीर करताच तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झालेला पाहायला मिळाला.
नूरवीच्या आगमनाने मात्र मृणालच्या आयुष्यात अनेक बदल घडून आले असे ती एका पोस्टद्वारे म्हणाली होती. नूरविच्या येण्याने नीरज बोलता झाला असे तिने त्यात म्हटले होते. आणि शेवटी नीरज बोलता झाला, नाहीतर घरात मी नाही बोलले तर कुणीच बोलत नाही, भयंकर शांतता, पण आता सगळं बदलतंय’ असे म्हणत मृणालने नूरवी आणि निरजचा एक क्युटसा व्हिडीओ शेअर केला होता. त्यावेळी बाप लेकीचं हे नातं पाहून अनेकांनी कौतुक केले होते. नूरवी आता लवकरच एक महिन्याची होत आहे आणि तिचा एक सुंदरसा फोटो मृणालने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. नूरविचा हा पहिला वहिला फोटो पाहून अनेकांनी तिचं तोंडभरून कौतुक केलं आहे. मृणालच्या मुलीचा हा पहिला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
चंदेरी दुनियेत बऱ्याचदा असे अनुभवायला मिळते की बहुतेक कलाकार मंडळी आपल्या मुलांना कॅमेऱ्यासमोर आणण्याचे टाळतात. मध्यंतरी विराट कोहली आणि अनुष्काच्या मुलीचा फोटो एका मॅच दरम्यान कॅमेऱ्यात कैद करण्यात आला होता. तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहून अनुष्काने तो फोटो डिलीट करण्याची विनंती केली होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ही कलाकार मंडळी आपल्या मुलांबाबत कठोर भूमिका घेताना पाहायला मिळतात. आपल्या आवडत्या खेळाडू आणि कलाकारांची मुलं कशी दिसतात याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. आणि म्हणूनच मृणालच्या लेकीचा पहिला वहिला फोटो पाहून चाहत्यांनी देखील तिच्यावर लाईक्सचा पाऊस पाडलेला पाहायला मिळतो आहे.