रंग माझा वेगळा या मालिकेत येत्या काही दिवसात रंजक घडामोडी घडलेल्या पाहायला मिळणार आहेत. दीपा आता इंटरनॅशनल फेअरनेस क्रीमची मॉडेल बनणार आहे. हा ट्विस्ट येण्याअगोदर तिला काही अडथळे पार करावे लागणार आहेत. याच स्पर्धेत जाऊन श्वेताला देखील मॉडेल व्हायची ईच्छा आहे. आपल्या कंपनीच्या न्यू प्रॉडक्ट्सची मला मॉडेल बनायचं आहे हे ती सौंदर्याजवळ बोलून दाखवते. सौंदर्याला श्वेताच्या या बोलण्याचा धक्का बसतो. हे एक इंटरनॅशनल कॅम्पेन आहे आणि मॉडेलचा चेहरा स्पॉन्सर सिलेक्ट करणार आहेत. तू ऑडिशन दे जर तुला यात सिलेक्ट केलं तर माझं काहीही म्हणणं नाही. असे म्हणत सौंदर्या तिला मॉडेल बनण्यासाठी परवानगी देताना दिसणार आहे.
इकडे दीपा आणि साक्षी ऑफिसमध्ये काही कामासाठी आलेल्या असतात. या सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्याची ईच्छा असलेल्या काही तरुणी ऑफिसमध्ये आलेल्या असतात. दीपाला पाहून या सर्वजणी हसू लागतात आणि तुला ऑडिशन द्यायची असेल तर आमच्या मागे नंबर लाव असे सांगतात. साक्षीला त्या मुलींचा राग येतो आणि दिपाच्या नकळत ती या ऑडिशनसाठी दिपाच्या नावाने फॉर्म भरते. काही वेळाने श्वेता तिथे दाखल होते आणि ह्या फेअरनेस क्रीमच्या ऍडमध्ये मीच मॉडेल बनणार असे सगळ्यांना सांगते. आणि ऑडिशनसाठी आलेल्या मुलींना ती तिथून हाकलून लावते. दिपाही निघून जाण्याच्या तयारीत असताना श्वेता तिला थांबवते आणि तू ह्या स्पर्धेसाठी फॉर्म भरला आहेस ना असे विचारते.
त्यावेळी दिपा गोंधळून जाते मी फक्त डाएट फूड बद्दल विचारायला इथे आले होते असे म्हणते. तेव्हा श्वेता तिला तिच्या रंगावरून हिनवते तोंड बघितलंस का आरशात? हि एक इंटरनॅशनल ऍड आहे. श्वेताचे हे बोलणे ऐकून साक्षी पुढे येते आणि मीच दिपाचा फॉर्म भरला असे स्पष्टीकरण देते. या स्पर्धेत आता श्वेताला तगडी टक्कर देण्यासाठी दीपा देखील सज्ज झालेली पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या ऑडिशनमध्ये स्पॉन्सर दिपाची निवड कशी करतात याची उत्सुकता अधिक आहे. या सौंदर्य स्पर्धेच्या थिममध्ये दीपा आणि तिची लेक कार्तिकी सहभागी होणार आहे. माय लेकीच्या थीमसाठी दीपा आणि कार्तिकीचेच सिलेक्शन होणार हे निश्चित आहे. मात्र श्वेता या स्पर्धेत दिपासमोर अडथळे निर्माण करणार हे प्रेक्षकांना ओळखून आहे.