मिथिला पालकर हिने मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. एक हरहुन्नरी आणि तितकीच उत्साही अभिनेत्री म्हणून तिची गणना केली जाते. दादर येथे ती आपल्या आज्जी आणि आजोबांसोबत गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहे. त्यामुळे सहाजिकच त्यांचा तिला लळा लागला होता. मिथिलाच्या आजोबांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वृध्दापकालाने निधन झाले आहे. त्यामुळे मिथिलाच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आपल्या आजोबांना ती भाऊ म्हणून हाक मारत असे. आजोबा आणि नातीचं जुळून आलेलं एक छान बॉंडिंग सोशल मीडियाच्या माध्यमातून पहायला मिळाले होते.
मिथिलाने अभिनय क्षेत्रात यावे यासाठी त्यांचा सुरुवातीला वोरोध होता मात्र त्यानंतर आजोबांनीच तिला या क्षेत्रात येण्यासाठी जास्त प्रोत्साहन दिले होते. २६ मार्च रोजी मिथिलाच्या आजोबांचे दुःखद निधन झाले आहे. आजोबांच्या आठवणीत एक भावनिक आठवण लिहिली आहे. ‘माझ्या जगाचे केंद्रबिंदू, मला सतत प्रोत्साहन देणारे माझे भाऊ काही दिवसांपूर्वी आम्हाला सोडून गेले.त्यांच्याशिवाय माझं आयुष्य कसं असेल याचा मी कधी विचारच केला नाही. ते लढवय्ये होते त्यांचं आयुष्यावर खूप प्रेम होतं त्यांच्यासारखंच आयुष्य जगण्याचा आम्ही प्रयत्न करू. ते माझ्यासाठी खूप खास होते आणि ते नेहमी माझ्यासाठी नंबर १ राहतील’ असे ती म्हणते.
आज्जी आणि आजोबांसोबतचे खास व्हिडिओ मिथिला नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असे. आज्जी आजोबांसोबत जुळून आलेलं तिचं हे खास नातं कोणालाही हेवा वाटावं असंच होत. आजोबांचा एक जुना रेडिओ मिथिलाला त्यांच्या कपाटात सापडला होता त्यावर लागलेल्या गाण्यांवर मिथिला नृत्य करत असे. तसेच त्यांच्या घरात काही वाद्य होती ती वाद्य घेऊन मिथिला ती वाजवायला शिकायची. यातूनच ती कप सॉंगची चाहती झाली. मुरांबा, गर्ल इन द सिटी, कारवां, चॉपस्टिक्स, त्रिभंग, लिटिल थिंग्स अशा चित्रपटातून बानी वेबसिरीजमधून मिथिलाच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक करण्यात आले आहे. आजोबांच्या पाठिंब्यामुळेच मी हे यश गाठू शकले असे ती नेहमी म्हणते.