Breaking News
Home / नाटक / नाटकाच्या तिकिटातून मिळालेली रक्कम शस्त्रक्रियेसाठी दिल्याने कलाकारांचं होतंय कौतुक
actor devendra sardar
actor devendra sardar

नाटकाच्या तिकिटातून मिळालेली रक्कम शस्त्रक्रियेसाठी दिल्याने कलाकारांचं होतंय कौतुक

गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपट तसेच नाटकांना प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. सगळीकडे हाऊसफुल्लचे बोर्ड लागत असल्याने मराठी सृष्टीत उत्साहाचे वातावरण आहे. अर्थात पूर्ण क्षमतेने नाट्यगृह आणि चित्रपटगृह भरत नसली तरीही निर्मात्यांना तिकीट बारीवर चांगली कमाई कमवता आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक घडी विस्कळीत झालेली असताना हे हाऊसफुल्लचे बोर्ड कलाकारांना समाधान देणारे ठरत आहेत. मात्र अशा परिस्थिती देखील कलाकारांनी दाखवलेला उदारपणा कौतुकास पात्र ठरताना दिसत आहे. त्याला एक खास कारण देखील आहे. प्रा वसंत कानेटकर लिखित आणि राजा अत्रे दिग्दर्शित ‘छुमंतर’ या विनोदी नाटकाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे.

actor devendra sardar
actor devendra sardar

छुमंतर हे एक विनोदी नाट्य कलाकृती आहे. दोन दिवसांपूर्वी या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. त्यातून मिळालेली तब्बल ८१,७०० रुपयांची रोख रक्कम स्वराली आणि स्वरांजली या दोन बहिणींच्या उपचारासाठी देण्यात आली आहे. स्वरांजली आणि स्वराली या दोन बहिणींवर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. त्यांच्यावर उपचारासाठी मोठा खर्च लागणार असल्याने, छुमंतर या नाटकाच्या टीमने समाजापुढे आदर्श निर्माण करत प्रयोगातून मिळालेली रोख रक्कम त्यांच्या पालकांना दिली आहे. एवढेच नाही तर या नाटकाचे अजून ९ प्रयोग करणार आहे त्यातून जेवढी रक्कम जमा होईल ती या दोघी बहिणींच्या उपचारासाठी देण्यात येईल असेही नाटकाच्या टीमने म्हटले आहे. येत्या ६ मार्च रोजी कर्जत येथील रॉयल गार्डन येथे छुमंतर या नाटकाचा प्रयोग होणार आहे.

chhumantar swarali swaranjali donation
chhumantar swarali swaranjali donation

हे नाटक पाहण्यासाठी नाटकाच्या टीमने प्रेक्षकांना आवाहन केले आहे की, एक तिकीट कोणाचा तरी श्वास बनू शकतो. स्वराज्यरक्षक संभाजी आणि ती परत आलीये या मालिकेतील अभिनेत्री देवेंद्र सरदार यांनी या नाटकात चिमाजी आप्पांची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. स्नेहा पाटील, दर्शना कुलकर्णी सरदार, ऋषिकेश पिंगळे, स्नेहल तटकरे, साहिल परब, प्रमोद कार्ले, वैभव परदेशी, ऋषिकेश घाग, सचिन पोळेकर या कलाकारांनी नाटकातून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. नाटकाचे अजून ९ प्रयोग होणार असून त्यातून मिळणारी रक्कम या दोन्ही बहिणींच्या उपचारासाठी देण्यात येणार आहे. नाटकाच्या टीमने घेतलेला हा निर्णय स्तुत्य ठरला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा टीमने बाळगली आहे.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.