आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधती एक रात्र बाहेर थांबल्याने संतापलेल्या अनिरुद्धने तिला याबाबत जाब विचारला होता. मात्र अनिरुद्धने आपल्या चारित्र्यावर संशय घेतल्याने अरुंधतीने घर सोडण्याचा निर्णय घेतला. तर एकीकडे अनघाने मात्र अरुंधतीच्या बांधनावर असलेली आडकाठी बाजूला सारून तिला ड्रेस घालण्यासाठी सगळ्यांची संमती मिळवली. नुकतेच व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने अनघा आणि अभिची लव्हस्टोरी हळूहळू खुलताना दिसू लागली. मात्र अशी लव्हस्टोरी अनघाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्याही आयुष्यात आली आज का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलेली पाहायला मिळते आहे. कारण अश्विनी महांगडे हिने काल व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी एक फोटो शेअर केलेला पाहायला मिळाला.

या फोटोमध्ये ती ज्या व्यक्तीसोबत दिसत आहे त्यावरून आणि दिलेल्या कॅप्शन वरून ती त्या व्यक्तीच्या प्रेमात तर नाही ना? अशी चर्चा रंगली आहे. अश्विनीने निलेश जगदाळे सोबत एक फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत सोबतच तिने हॅशटॅग माय बर्थडे बॉय लव्ह असे म्हणत एक पोस्ट लिहिली आहे. यश आणि अपयश हे जे काही असेल ते पाहताना तुम्ही सोबत आहेत याचा आनंद आहे बाबा. सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणे हा तुमचा विचार सगळ्यात जास्त भावला. खूप खूप शुभेच्छा बाबा. अश्विनीच्या या पोस्टमुळे ती निलेश जगदाळे याच्या प्रेमात असल्याचे तिच्या चाहत्यांनी देखील म्हटले आहे. याबाबत लवकरच उलगडा होईल. तूर्तास अश्विनी ज्या व्यक्तीच्या प्रेमात असल्याचे बोलले जाते तो निलेश जगदाळे व्यावसायिक आहे.

याशिवाय मोरया प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती संस्था त्याने उभारली आहे. या निर्मिती संस्थेतून वेबसिरीज, चित्रपट इव्हेंट मॅनेजमेंट केले जात आहेत. एवढेच नाही तर फार्म फ्रेश ऑरगॅनिक फ्रेश या व्यवसाया अंतर्गत मसाले, लोणचे, ड्रायफ्रूट,फळे, हळद, केसर यांची विक्री केली जाते. अश्विनी महांगडे हिने रयतेचे स्वराज्य या प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. या सामाजिक कार्यात निलेशची देखील खंबीर साथ अश्विनीला मिळताना दिसते. त्यामुळे अश्विनी निलेशच्या प्रेमात आहे असा विश्वास तिच्या चाहत्यांना आता वाटू लागला आहे. अस्मिता, स्वराज्यरक्षक संभाजी अशा मालिकांमधून अश्विनी महांगडे हिने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. मालिकेसोबतच सामाजिक कार्यात देखील ती नेहमीच सहभागी असते.
मागील काळात देखील अनेक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवणाची सोय उपलब्ध करून दिली होती. सातारा जिल्ह्यातील वाई या सांस्कृतिक नगरीत अश्विनी लहानाची मोठी झाली. वडिलांच्या सामाजिक कार्याची आणि अभिनयाची आवड तिच्यात देखील आपसूकच निर्माण होत गेली. मालिकेतून घराघरात पोहोचलेली अश्विनी आई कुठे काय करते या मालिकेत अनघाच्या दमदार भूमिकेत पाहायला मिळत आहे. तिच्या असण्याने अरुंधतीच्या आयुष्यात कुठले बदल होणार आणि ती आपल्या सासूची साथ कशी देणार हे मालिकेत पाहायला मिळणार आहे. तूर्तास अश्विनीच्या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगलेली पाहायला मिळत असल्याने अश्विनी याबाबत काय खुलासा करणार याची उत्सुकता आहे.