Breaking News
Home / मराठी तडका / पहिल्याच भेटीत एकमेकांनी दिला होता नकार.. दिव्या आणि अक्षयची भन्नाट लव्हस्टोरी
divya and akshay
divya and akshay

पहिल्याच भेटीत एकमेकांनी दिला होता नकार.. दिव्या आणि अक्षयची भन्नाट लव्हस्टोरी

मुलगी झाली हो या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री दिव्या सुभाष आणि अक्षय घरत यांचा काही दिवसांपूर्वी टिळा डेझाला त्यानंतर हे दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. मागील दोन वर्षांपासून या दोघांची ओळख आहे लॉक डाऊनच्या काळात त्यांची खुललेली ही प्रेमकहाणी तितकीच भन्नाट आहे. दिव्या आणि अक्षयची लव्हस्टोरी खुलली ती सोशल मीडियाच्या माध्यमातून. अक्षय घरत हा फिटनेस ट्रेनर असला तरी एका परदेशी बँकेसाठी तो काम करत आहे. लग्नाचे वय झाले असल्याने तो एका पार्टनरच्या शोधात होता. फेसबुकवर दिव्याची प्रोफाइल पाहिल्यावर त्याने तिला लगेचच फ्रेंडरिक्वेस्ट पाठवली होती.

divya and akshay
divya and akshay

त्यानंतर जवळपास १५ दिवसांनी दिव्याने अक्षयची माहिती घेऊन त्याची फ्रेंडरिक्वेस्ट स्वीकारली. यानंतर दोघेही एकमेकांना चॅटिंग द्वारे संवाद साधत राहिले. मग व्हिडीओ कॉल आणि फोन कॉलवरून त्यांच्यात बोलणे वाढू लागले. कडक लॉक डाऊनच्या काळात अक्षय दिव्याला पहिल्यांदा भेटायला आला त्यावेळी दिव्याला समोरासमोर पाहून, ही खूप लहान आहे असा अक्षयने विचार केला. तर तिथेच दिव्याने देखील हा खूपच मोठा आहे असा विचार केल्याने रात्री फोन करून त्यांनी एकमेकांना आपला नकार कळवला होता. या नकारानंतर मात्र अक्षय पुन्हा दिव्याला मिस करू लागला होता. आणि त्यानंतर दोघांमधील संवाद पुन्हा सुरू झाला.

divya subhash akshay gharat
divya subhash akshay gharat

आपले लग्नाचे वय झाले आहे आणि माझ्याकडे अजून दोन वर्षांचा कालावधी आहे असे म्हणत त्याने दिव्याला आपला हेतू स्पष्ट सांगितला होता. दोघेही रायगड जिल्ह्यातले असल्याने एकमेकांच्या संस्कृतीची जाणीव त्यांना होती. दिव्या अभिनेत्री आहे हे अक्षयच्या घरी समजले त्यावेळेस कलाकारांना वेळेचं बंधन नसतं, रात्री अपरात्री शूटिंगला जावं लागतं या कारणास्तव त्याच्या घरच्यांनी तिला नकार दिला होता. मात्र कालांतराने त्याच्या आई वडिलांनी दिव्याला पसंती दर्शवली. गेल्या वर्षी दिव्याच्या वाढदिवसाच्या दिवशी अक्षयने वाई येथे मालिकेच्या सेटवर येऊन तिला बर्थडे सरप्राईज दिलं होतं. त्यावरून दिव्या अक्षयच्या प्रेमात आहे हे जवळपास सर्वच प्रेक्षकांना समजले होते.

दिव्या आणि अक्षय यांच्यात आता खूप छान बॉंडिंग झालं आहे. प्रेमात असलं की आपल्या पार्टनरच्या चुका आणि त्यांचे रुसवे फुगवे विसरून अर्ध्या तासाने ठरवून फोन करायचाच, त्यामुळे कितीही वाद झाले तरी आम्ही पुन्हा लगेचच एकत्र येतो. प्रेम व्यक्त करायला व्हॅलेंटाईन डे हा फक्त एकच दिवस का असावा आपण प्रत्येक दिवशीच आपलं प्रेम दाखवू शकतो असं अक्षय  म्हणतो. लवकरच आम्ही दोघे लग्न करणार आहोत असेही संकेत या दोघांनी व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी दिले आहेत.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.