मराठी चित्रपट तसेच मालिका अभिनेत्री तेजा देवकर हिच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे. तेजाचे वडील सुरेश देवकर यांचे १७ जानेवारी रोजी निधन झाले आहे. पण वडिलांच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही असे म्हणत तिने एक भावनिक आठवण शेअर केली आहे. तेजाचे वडील सुरेश देवकर हे मुंबईत बीजनेसमन होते. तर तिची आणि नीता देवकर मराठी सृष्टीत निर्माती म्हणून ओळखल्या जातात. तेजा देवकर हिने हिरवं कुंकू या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते.
ऑक्सिजन, चल धर पकड, खंडोबाचं लगीन, अदला बदली, सासूचं स्वयंवर, राधिका, नाती, वृंदावन, कुलस्वामिनी, माय लेक, एक झुंज वादळाशी, चिमणीपंख अशा चित्रपट तसेच टीव्ही मालिकांमधून तेजाने मुख्य भूमिका निभावल्या आहेत. शंभू माझा नवसाचा या चित्रपटात तेजाने खलनायिकेची विरोधी भूमिका साकारलेली पाहायला मिळाली. तेजाच्या आईने म्हणजेच नीता देवकर यांनी ऑक्सिजन या चित्रपटाचे कथालेखन केले होते, तसेच या चित्रपटाची निर्मिती त्यांनीच केली होती. ऑक्सिजन या चित्रपटात तेजाने मुख्य नायिकेची भूमिका साकारलेली पाहायला मिळाली.
तेजा देवकरची बहीण सुर्या देवकर हिने देखील ऑक्सिजन चित्रपटासाठी निर्माती म्हणून जबाबदारी सांभाळली होती. वडील असतात, त्यात काय विशेष, पण ते नसतात तेव्हा काय हे आज कळलं. त्यांचा आधार असतोच, पण ते नसतात तेव्हा काय, हे आज कळलं. काही नुकसान हे कधीच भरून निघणार नसतं. असे म्हणत वडिलांच्या निधनाने तेजा देवकर हिने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तेजाचे वडील सुरेश देवकर यांना आमच्या टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली.