जाहिरात क्षेत्रात जम बसलेला दिग्दर्शक आणि निर्माता नितीश पाटणकर आणि भक्ती मेढेकर यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. पी एन गाडगीळ सन्स यांच्या बऱ्याचशा टीव्ही जाहिरातींसाठी दिग्दर्शन तसेच निर्माता म्हणून नितीशने काम सांभाळले आहे. काही जाहिरातीचे कन्सेप्ट देखील त्यानेच केलेले पाहायला मिळते आहे. तर भक्ती पाटणकर ही कॉस्ट्युम डिझायनर आहे. रक्षाबंधन स्पेशल स्पृहा जोशी आणि संकर्षण कऱ्हाडे यांनी आयुषी या चितळे बंधूंच्या जाहिरातीत काम केले होते. याचे दिग्दर्शन नितीशने केले होते तर भक्तीने वेशभूषेची जबाबदारी स्वीकारली होती. इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या जाहिरातीचे दिग्दर्शन देखील नितीशने केले होते.
या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध कलाकार निर्मिती सावंत झळकल्या होत्या. भक्ती पाटणकर ही देखील गेल्या काही वर्षांपासून कला सृष्टीशी जोडली गेली आहे. भक्तीने देखील अनेक जाहिरातींसाठी कॉस्ट्युम डिझायनर म्हणून काम सांभाळले आहे. निवेदिता अशोक सराफ, रश्मी अनपट, विजय पटवर्धन आणि सुयश टिळक अभिनित मी स्वरा आणि ते दोघे या नाटकाचे दिग्दर्शन नितीश पाटणकर याने केले आहे. काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत लोकरे निर्मित या नाटकाच्या प्रमोशनसाठी ते चला हवा येऊ द्याच्या मंचावर दाखल झाले होते. नितीश हा मूळचा पुण्याचा, अनेक वर्षांपासून तो नाट्यसृष्टीशी जोडला गेलेला आहे. यशस्वी जाहिरातींमुळे त्याला नाट्य दिग्दर्शन क्षेत्राचे वेध लागले.
ना बोले वो हराम ही त्याने बनवलेली पहिली शॉर्टफिल्म ठरली होती. अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये ना बोले ही शॉर्टफिल्म प्रशंसनीय ठरली होती. तर या फिल्मला SAARC अवॉर्डने पुरस्कृत केले गेले होते. आरोहण, हिंग पुस्तक तलवार अशा शॉर्टफिल्म आणि चित्रपट त्याने दिग्दर्शीत केले आहेत. रकणटपा या स्वताच्या निर्मिती संस्थेतून अनेक जाहिरातींसाठी त्याने काम केले आहे. आजवर त्याने केलेल्या वैविध्यपूर्ण जाहिरातींनी प्रेक्षकांची माने जिंकून घेतली आहेत. अनुभवाचे बोल ही कन्सेप्ट त्याने प्रेक्षकांसमोर आणली होती. त्याला प्रेक्षकांकडून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर यांनी त्यांच्या सेवकाळातील अनुभव शेअर केले होते.
तर डॉ बाबा आढाव, डॉ के एच संचेती, माधव अभ्यंकर यांनीही आपले अनुभव या सेगमेंट अंतर्गत शेअर केले होते. तर भक्ती मेढेकर हिने कॉस्ट्युम डिझायनर म्हणून नितीश पाटणकर सोबत एकत्रित काम केले. त्यामुळे भक्ती आणि नितीश यांची खूप अगोदरपासूनची चांगली मैत्री होती. आता या मैत्रीला त्यांनी सुंदर नात्याच्या बंधनात अडकवलेलं पाहायला मिळत आहे. पुण्यात या दोघांचा साखरपुडा संपन्न झाला. मोजक्याच मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना त्यांनी या सोहळ्याला आमंत्रीत केले होते. नितीश पाटणकर आणि भक्ती मेढेकर यांच्या आयुष्यातील या गोड सुरुवातीला कलाकार टीम तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.