गेल्या अनेक दिवसांपासून ‘दादा एक गुड न्युज आहे’ हे नाटक गेल्या अनेक दिवसांपासून मोठे चर्चेत आहे. अशात अभिनेत्री प्रिया बापट निर्मित आणि अद्वित दादरकर दिग्दर्शित विनीत नमिता या भावा बहिणीच्या सुंदर नात्यावरील या नाटकाचा २०० वा प्रयोग देखील लवकरच तिकीट बारीवर हाऊसफुल ठरणार आहे. या विषयीची माहिती अभिनेता उमेश कामतने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन दिली. यावेळी त्याने २०० प्रयोग होणार असल्याने जंगी सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
यामध्ये अभिनेत्री हृता दुर्गुळे, उमेश कामत, आरती मोरे, ऋषी मनोहर, जयंत घाटे हे सर्व कलाकार आनंद व्यक्त करत नाचत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅपशनमध्ये लिहिले आहे की, “प्रयोग क्र १९८ शनिवार ८ जानेवारी रा. ९:३० वा. टिळक स्मारक, पुणे” त्याचबरोबर पुढील ,”प्रयोग क्र १९९ रविवार ९ जानेवारी दू.१२:३० वा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह,चिंचवड” येथे होणार आहे. आता बघता बघता तब्बल २०० व्या प्रयोगा पर्यंत हे नाटक येऊन पोहचलं आहे. उमेशने २०० व्या प्रयोगाविषयी देखील लिहिलं आहे की, “प्रयोग क्र २०० रविवार ९ जानेवारी सायं. ५:३० वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड, पुणे.” गेल्या अनेक दिवसांपासून ‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे नाटक तिकीट बारीवर हाऊसफुल ठरत आहे. आता २०० चा टप्पा देखील गाठणार असल्याने सर्व कलाकारांसह नाटकातील सहभागी कलाकार देखील खूप खुश आहेत.
गेले अनेक दिवस नाट्यगृह आणि सिनेमागृह बंद होते. या काळात नाट्यसृष्टीतील अनेक कलाकारांना याचा चांगलाच आर्थिक फटका बसला होता. अशात अनेक प्रेक्षक वर्ग देखील नाट्यगृह सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहात होते. २२ ऑक्टोबर पासून नाट्यगृह सुरू झाल्यानंतर लगेचच कल्याणी फडतरे लिखित ‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे नाटक नाट्यगृहात लागले. त्यामुळे नाट्य प्रेमींनी ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाकडे उत्स्फूर्तर्तेने आपला मोर्चा वळवला. आता या नाटका नंतर लवकरच ‘चार्ली’, ‘कुर्रर्रर्र’, ‘वन्स मोअर तात्या’, ‘भावाला जेव्हा जाग येते’, ‘संगीत शोले’ ही आगामी नाटके लवकरच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी रंगभूमीवर झळकणार आहेत.