Breaking News
Home / मराठी तडका / मुलगी झाली हो मालिकेतील साजिरी खऱ्या आयुष्यात बांधणार लग्नाची गाठ..
actress divya subhash engagement
actress divya subhash engagement

मुलगी झाली हो मालिकेतील साजिरी खऱ्या आयुष्यात बांधणार लग्नाची गाठ..

मुलगी झाली हो या लोकप्रिय  मालिकेतील प्रमुख पात्र शौनक आणि साजिरीचा विवाहसोहळा काही दिवसांपूर्वीच संपन्न झाला होता. त्यांच्या लग्नसोहळ्याचा एपिसोड टीआरपी मध्ये मजल मारताना दिसला होता. मालिकेतील आर्या म्हणजेच अभिनेत्री श्वेता अंबिकर खऱ्या आयुष्यात विवाहबद्ध झाली आहे. दोन दिवसांपूर्वी श्वेताने अमेय गोरे या तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली. तिच्या पाठोपाठ मुलगी झाली हो मालिकेतील साजिरी म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगावकर ही देखील आता लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे दिसून येते.

actress divya subhash engagement
actress divya subhash engagement

दिव्याने तिचा बॉयफ्रेंड अक्षय घरत ह्याच्यासोबत नुकताच साखरपुडा केला आहे. दिव्याने आपल्या आयुष्यातील हे आनंदाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. दिव्याचा बॉयफ्रेंड अक्षय घरत हा खूपच हँडसम असून तो फिटनेस मॉडेल आहे. न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर म्हणूनही त्याची ओळख आहे. अक्षय आणि दिव्या खूप आधीपासून एकमेकांना ओळखत आहेत. यातूनच हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. नुकत्याच झालेल्या दिव्याच्या वाढदिवसाला अक्षयने मुलगी झाली हो या मालिकेच्या सेटवर येऊन तिच्यासाठी स्पेशल अरेंजमेंट केली होती यात तिच्या सहकलाकारांनी अक्षयला मदत देखील केली होती. दिव्याने सेटवर दिलेल्या अक्षयच्या या सरप्राईजला आजवर दिलेले सर्वात बेस्ट सरप्राईज आहे असे म्हणून अक्षयचे आभार मानले होते. त्यामुळे दिव्या सिंगल नसून तिला बॉयफ्रेंड आहे हे तिच्या चाहत्यांना समजले होते. दिव्याच्या सौंदर्यावर भाळलेल्या तिच्या चाहत्यांसाठी ही बातमी नक्कीच हार्ट ब्रेक करणारी ठरली.

divya subhash engagement
divya subhash engagement

मूळची माणगावची असलेल्या दिव्याने २०१९ सालच्या ‘श्रावण क्वीन’ या सौंदर्य स्पर्धेत सहभाग दर्शवून मिस टॅलेंटेडचा मान पटकावला होता.
मॉडेलिंगची आवड असलेल्या दिव्याने २०१७ साली मुंबईची सुकन्या स्पर्धेत मोस्ट पॉप्युलर फेसचे मानांकन प्राप्त केले होते. दिव्या माणगावची असली तरीही तिचे संपूर्ण शिक्षण मात्र मुंबईतच पूर्ण झाले आहे. दिव्याने मुलगी झाली हो या मालिकेअगोदर ‘प्रेमा तुझा रंग कसा’ आणि ‘विठुमाऊली’ या मालिकेतून छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. मुलगी झाली हो या मालिकेतून तिला पहिल्यांदा ‘माऊची’ प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. तिने साकारलेल्या माऊच्या पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे त्याचमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली आहे. दिव्या सुभाष आणि अक्षय घरत हे दोघे आता कधी लग्न करणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.

maau actress divya subhash
maau actress divya subhash

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.