फुलपाखरू या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली हृता दुर्गुळे सध्या झी मराठी वाहिनीवरील मन उडू उडू झालं या मालिकेत दिपूची भूमिका साकारत आहे. मालिकेत दिपू आणि इंद्रा यांची लव्हस्टोरी लवकरच जुळून येणार आहे त्यासाठी इंद्रा नेहमीच प्रेमाची कबुली देण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो. मात्र त्याला अजूनही यश मिळालेले दिसत नाही त्यामुळे येत्या रविवारी १ तासाच्या विशेष भागात तो दिपूला तिच्याबद्दलच्या प्रेमाची कबुली देताना दिसणार आहे. मात्र त्यानंतर हृताची रिऍक्ट होते हे पाहणे रंजक होणार आहे.
तर इकडे दिपूची भूमिका साकारणारी हृता खऱ्या आयुष्यात प्रेमात पडलेली पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हृताने बॉयफ्रेंड सोबतचा फोटो शेअर केला आहे आणि त्यात त्या दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिलेली दिसत आहे. हृता हिंदी मालिका दिग्दर्शक “प्रतीक शाह” याला डेट करत आहे. तिच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो आहे तर तिच्या चाहत्यांनी देखील तिला भरभरून शुभेच्छा देऊन तिचे अभिनंदन केले आहे. हृताचा बॉयफ्रेंड प्रतीक शाह उत्कृष्ट डान्सर असून हिंदी मालिका दिग्दर्शक आहे. प्रतीकने हिंदी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. त्याने बेहद २, बहू बेगम, कुछ रंग प्यार के ऐसे भी, तेरी मेरी एक जिंदड़ी, इक दिवाना था, मनमोहिनी या गाजलेल्या मालिकांसाठी काम केले आहे. यात आणखी एक विशेष बाब म्हणजे प्रतिकची आई मराठी मालिका तसेच चित्रपट अभिनेत्री आहे. मराठी चित्रपट तसेच मराठी मालिका त्याचप्रमाणे हिंदी मालिका अभिनेत्री मुग्धा शाह या प्रतिकच्या आई आहेत. आईची मिळालेली साथ याचमुळे तो हिंदी सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करताना दिसत आहे.
मुग्धा शाह यांनी बे दुणे साडे चार, मिस मॅच, कर्तव्य, माहेर माझं हे पंढरपूर, पुछो मेरे दिल से, संभव असंभव अशा मालिकेतून चित्रपटातून अभिनय साकारला आहे. हिंदी मालिका सृष्टीत त्यांनी बहुतेकदा नायक नायिकेच्या आईची भूमिका त्याचप्रमाणे विरोधी भूमिका देखील निभावल्या आहेत. त्यामुळे हिंदी मालिका सृष्टीत त्यांना जास्त ओळखले जाते. तर मराठी चित्रपटात देखील त्यांनी सहाय्यक तसेच विरोधी भूमिका साकारलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे मराठी सृष्टीत देखील मुग्धा शाह यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला दिसून येतो. मन उडू उडू झालं या मालिकेत हृताने निभावलेली दिपू प्रेक्षकांना खूपच भावली आहे. यर अनेक तरुण तिच्या घाऱ्या डोळ्यांवर आणि तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्सवर फिदा आहेत. बॉयफ्रेंडला दिलेल्या प्रेमाच्या कबुलीमुळे हृताला फॉलो करणारे तरुण चाहते मात्र आता या बातमीवर काहीशे नाराज होतील हे नक्की, तूर्तास हृता प्रतीक सोबत कधी लग्न करणार ह्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.