नमस्कार मंडळी कसे आहात ! मजेत ना ! हसताय ना, हसायलाच पाहिजे एवढं ऐकलं तरी प्रत्येकाच्या ओठात चला हवा येवू द्या शोचं नाव आपोआप येतं. उत्तम अभिनय आणि विनोदाचं जबरदस्त टायमिंगमुळे कुशलने मराठी सृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलं. रंगमंचापासून सुरु झालेला कुशलचा प्रवास, छोट्या पडद्यावरुन आता मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालतोय. भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे यांची केमेस्ट्री प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करीत आहे.

नीलेश साबळेंनी जेव्हा चला हवा येऊ द्याची तयारी सुरु केली होती, त्यावेळीच भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेला या शोमध्ये घ्यायचे निश्चित केले होते. शो मधील सर्वच कलाकारांचे अफलातून विनोद आणि अभिनय यांनी पॉप्युलॅरिटी अबाधित ठेवली आहे. शोमुळे श्रेया आणि कुशल यांची झालेली निखळ मैत्री, ऑफ स्क्रीन देखील धमाल मस्तीची आहे. मागील काही काळ कुशलसाठी खूपच तणावात गेला, सोशल मीडियावर चर्चाही जोरदार होती. पण ह्या सर्वातून पुढे जाण्यासाठी त्याला श्रेयाच्या छोट्याश्या भेटीमुळे शक्य झाल्याचे त्याने नुकतेच सांगितले. त्याविषयी बोलताना तो म्हणतो, श्रेया बुगडे मी आणि योगायोग. आमच्या team मधे सगळ्यांना gift देण्याची आवड श्रेयाला, तीला फक्त त्यासाठी निमित्त लागतं. एकदा मला एक Wallet gift करुन म्हणाली या पुढे हे wallet तुला कधीच काही कमी पडू देणार नाही आणी खरच त्यानंतर कधी काही कमी पडलं नाही, मागच्या दिवाळीत एक घड्याळ देऊन म्हणाली “your time starts now” आणी ह्या दिवाळीत ३ डिसेंबरला माझा नवा सिनेमा पांडू येतोय. मनापासून दिलेल्या शुभेच्छांच सोनं होतंच. माझ्या आयुष्याच सोनं करणारी ही, “बुगडे बाई” तुला खुप खुप प्रेम ❤️❤️❤️❤️.

मागील काही वर्षांत कुशलने डावपेच, बायोस्कोप, रंपाट, लूज कंट्रोल, स्लॅमबूक, जत्रा, गावठी, झोलझाल, बारायण, भाऊचा धक्का, हुप्पा हुय्या, हिच्यासाठी कायपण सारखे अनेक हिट चित्रपट साकारले. भाऊ आणि कुशलची जोडी प्रेक्षकांना खळखळून हसविण्यासाठी पुन्हा सज्ज झाली आहे. पांडू या चित्रपटात भाऊ कदम पांडू ही भूमिका साकारत असून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नखरेल उषाच्या तर लाडका कुशल महादू हवालदारच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. भाऊ आणि कुशल ही महाराष्ट्राची लाडकी जोडी मोठा पडदा गाजवण्यास डोक्यावर घालून टोपी आणि हातात घेऊन दांडू ३ डिसेंबरला थेटरात विनोदाचा धमाका करायला येतोय, झी स्टुडिओजचा नवीन सिनेमा “पांडू”.