Breaking News
Home / मालिका / ​मराठी अभिनेता मिहिर आणि रामायण मधील जनक राजा अभिनेते यांच्यात आहे हे नातं
actor mulraj rajda and mihir
actor mulraj rajda and mihir

​मराठी अभिनेता मिहिर आणि रामायण मधील जनक राजा अभिनेते यांच्यात आहे हे नातं

​माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून घराघरात पोहचलेला मराठी अभिनेता मिहीर आणि रामायणातील जनक राज्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच नेमकं काय नातं आहे हे जाणून घायची उत्सुकता तुम्हाला झाली असेल​​ पण त्यापूर्वी आपण मिहीर कोण आहे जे जाणून घेऊया. अभिनेता मिहीर राजदा अमराठी असला तरीही मराठी सृष्टीत तो आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर चांगलाच ओळखला जाऊ लागला आहे. गुजराती थेटर गाजविलेल्या मिहिरने नाटक तसेच हिंदी आणि मराठी मालिकांमधून अभिनयाची छाप पाडली. लोकप्रिय हिंदी मालिका कृष्णा यात बाल सुदामाची भूमिका मिहीरने साकारली होती.

actor mulraj rajda and mihir
actor mulraj rajda and mihir

मालिकेतील कृष्ण म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी आणि सुदामा म्हणजेच मिहीर राजदा यांची स्वप्नील जोशीच्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून भेट घडून आली होती. हमारी देवरानी या हिंदी मालिके नंतर तो मराठी सिने जगताकडे वळला. इथे त्याला माझ्या नवऱ्याची बायको या झी वाहिनीवरील मालिकेमध्ये आनंदची भूमिका मिळाली. मधल्या काळात त्याने स्क्रिप्ट लिखाणाची भूमिका चोख बजावली होती. सध्या तो सोनी मराठीवरील अभिनेते उमेश कामत आणि मुक्ता बर्वे स्टारर अजूनही बरसात आहे या मालिकेत काम करत आहे. मिहीर राजदाचे कुटुंब देखील कलाक्षेत्राशी निगडित आहे. त्याची पत्नी नीलम पांचाळ राजदा ही गुजराती तसेच हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे. काबिल, हेल्लारो या चित्रपटात ती झळकली आहे तसेच हमारी देवरानी, रुक जाना नही, क्राईम पेट्रोल, लाजवंती, इष्कबाझ, मन मै है विश्वास या मालिकांमधून काम केले. निलमने मराठी सृष्टीत देखील काम केले आहे, स्टार प्रवाहवरील वैजू नं १ या मालिकेत मिहीर आणि नीलम दोघेही पती पत्नीच्या भूमिकेत झळकले होते.

child sudama mihir rajda
child sudama mihir rajda

रामायणातील जनक राजा म्हणून प्रसिद्ध असलेले “मूलराज राजदा” हे प्रसिद्ध अभिनेते, लेखक सर्वांच्या परिचित आहेत. हिंदी, गुजराथी भाषिक अनेक चित्रपट आणि नाटके त्यांनी साकारली. लोकप्रिय रामायण मालिकेत त्यांनी राजा जनक यांची भूमिका साकारली होती. विक्रम वेताळ, महाभारत या मालिकेत त्यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या. त्यांच्या पत्नी इंदुमती राजदा या देखील अभिनेत्री आहेत. मन, खिचडी, साराभाई vs साराभाई, इन्स्टंट खिचडी, या मालिका आणि चित्रपटातून इंदुमती यांनी काम केले होते. नुकतेच मिहिरची पत्नी नीलमने सोशल मीडियाच्या माध्यमातून मूलराज राजदा यांना पुण्यतिथीदिनी श्रद्धांजली वाहिली आहे. ‘माझे आजोबा आणि सासरे’ असे कॅप्शन देऊन तिने ही माहिती शेअर केली. मूलराज राजदा यांनी साकारलेले रामायणातील राजा जनक प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहीले आहेत. त्यांनी त्याकाळी साकारलेल्या भूमिका प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. आजही त्यांनी केलेल्या त्या भूमिकांचं कौतुक अनेकजण करतात. तुम्ही आमच्या आणि तमाम भारत वासियांच्या स्मरणात सदैव रहाल यात तिळमात्र शंका नाही.

mihir rajda and neelam panchal
mihir rajda and neelam panchal

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.