Breaking News
Home / मराठी तडका / ​मुळशी पॅटर्न फेम पिट्या भाई करतोय परंपरागत व्यवसाय… व्यवसाय टिकून राहण्यासाठी प्रवीण तरडेचे आवाहन
pravin tarde ramesh and preeti pardeshi
pravin tarde ramesh and preeti pardeshi

​मुळशी पॅटर्न फेम पिट्या भाई करतोय परंपरागत व्यवसाय… व्यवसाय टिकून राहण्यासाठी प्रवीण तरडेचे आवाहन

मुळशी पॅटर्न या गाजलेल्या चित्रपटात पिट्या भाईची भूमिका साकारली आहे अभिनेते “रमेश परदेशी” यांनी. देऊळबंद, फत्तेशीकस्त, बेरीज वजाबाकी अशा आणखी काही चित्रपटातून रमेश परदेशी यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. तर काही मालिका तसेच नाटकांतून त्यांच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. रमेश परदेशी आणि प्रवीण तरडे यांची मैत्री अगदी बालपणापासूनची. ​कला क्षेत्रात एकत्रित काम करीत असल्याने​ आजही त्यांची मैत्री अशीच अबाधित राहिलेली पाहायला मिळत आहे.

pravin tarde ramesh and preeti pardeshi
pravin tarde ramesh and preeti pardeshi

प्रवीण तरडेने आपल्या चित्रपटातून नेहमीच आपल्या मित्र कलाकारांना अभिनयाची संधी मिळवून दिली आहे​,​ त्यात रमेश परदेशी यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. नुकतेच प्रवीण तरडे रमेश परदेशी यांच्या घरी जाऊन त्यांच्या पारंपरिक व्यवसायात मदत केलेली पाहायला ​मिळाली, त्यावेळी प्रवीण तरडे म्हणतात की, मित्राला त्याच्या पारंपरिक व्यवसायात मदत केलीच पाहिजे..​ ​जसं माझ्या गावाला शेताची कामं असतात​,​ भात लावायला किंवा काढायला ​येतो ​त्यावेळी पिट्या ​स्वतःहून येतो. पिट्याचा रांजण, कुंड्या, मडकी,​ बोळकी, किल्ले बनवून ते रंगवणे हा पारंपरिक व्यवसाय आहे. पौंड फाट्यावर​ पिट्याचे ​जुनं मोठं घर आहे,​ तिथे तो दरवर्षी हे काम करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी येतो. मी देखील त्याच्या या पारंपरिक व्यवसायाला नेहमी​​ मदत करायला येतो. जेव्हा आम्ही दुसरी तिसरी इयत्तेत शिकायला होतो त्यावेळी देखील मी पिट्याला या कामात मदत करायला यायचो​.

pravin tarde friend ramesh pardeshi
pravin tarde friend ramesh pardeshi

परंपरागत व्यवसाय टिकलेच पाहिजेत असे म्हणून प्रवीण तरडेने रमेश परदेशीला या पारंपरिक व्यवसायाला शुभेच्छा देत एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. पारंपरिक व्यवसाय टिकवून ठेवण्याची प्रवीण तरडेची तळमळ त्याच्या ह्या व्हिडिओतून जाणवली. प्रवीण तरडे हा उत्तम नट तर आहेच पण उत्तम लेखक आणि दिग्दर्शक​ ​ही आहे हे सर्वांनाच माहीत आहे​,​ मात्र ​प्रसिद्धीच्या ऐन झोतातही त्याने जपलेली ही मैत्री खरोख​रंच वाखाणण्याजोगी पाहायला मिळत आहे. मैत्रीचं नातं जीवा पलीकडचं असतं ते प्रवीण तरडे​ आणि पिट्या भाई यांच्याकडे पाहून कळतं. ​साधारण वर्षभरापूर्वी प्रवीण तरडेच्या शेतात भात लावणी सुरू होती त्यावेळी रमेश परदेशीने शेती कामात मदत केली होती. एवढेच नाही​ तर​ या कलाकारांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला होता. त्यांची ही मैत्री अशीच अबाधित राहो हीच एक सदिच्छा..

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.