Breaking News
Home / मराठी तडका / “तुझा इंस्टा आयडी नाही, अमरावतीला आलो की प्रपोज करेल…” शिव ठाकरे नक्की कोणाला म्हणतोय.. व्हिडीओ होतोय व्हायरल
shiv thakare proposes to
shiv thakare proposes to

“तुझा इंस्टा आयडी नाही, अमरावतीला आलो की प्रपोज करेल…” शिव ठाकरे नक्की कोणाला म्हणतोय.. व्हिडीओ होतोय व्हायरल

मराठी बिग बॉसच्या सिजन २ मध्ये शिव ठाकरेने पार्टीसिपेट केले होते, या दुसऱ्या सिजनचा तो विजेता ठरला होता. मराठी बिग बॉसच्या शोमध्ये विजेतेपद पटकवण्या अगोदर शिव ठाकरे एम टीव्ही रोडीज या रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाला होता. या शोमध्ये त्याने सेमिफायनल राउंड पर्यंत मजल मारली होती.रिऍलिटी शो मधून लोकप्रियता मिळवलेला शिव ठाकरे एका भन्नाट व्हिडिओमुळे चांगलाच चर्चेत येत आहे.

shiv thakare proposes to
shiv thakare proposes to

ह्या व्हिडिओत तो त्याच्या आज्जीला उचलून घेऊन तिच्यासोबत दंगा मस्ती करताना दिसत आहे. त्याने शेअर केलेला आज्जीसोबतचा हा व्हिडीओ अल्पावधीतच सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय होताना दिसत आहे. आजीच्या वाढदिवसा दिवशी शुभेच्छा देत तो सांगतो की, ” तू माझ्या लाईफचं सर्वात मोठं गिफ्ट आहेस बाप्पानी दिलेलं.. आज्जीपेक्षा जास्त प्रेम मला कोणीच नाही करू शकत.. तुझा इंस्टा आयडी नाही पण अमरावतीला आलो की तुला बोलून प्रपोज करेल…” अशी एक पोस्ट या व्हिडिओसोबत त्याने शेअर केली आहे. त्याच्या कॅप्शनमुळे आणि व्हिडिओ मधील धमाल मस्तीमुळे शिव ठाकरेचं आणि त्याच्या आज्जीचं सोशल मीडियावर मोठं कौतुक होताना दिसत आहे. या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक्सचा पाऊस पडत आहे. शिव ठाकरे हा मूळचा अमरावतीचा, रोडीज सारख्या दमदार रिऍलिटी शोचा तो एक भाग बनला आणि त्याला अमाप प्रसिद्धी मिळाली..

shiv thakare aaji dance
shiv thakare aaji dance

द अँटी सोशल नेटवर्क आणि मराठी बिग बॉसमध्ये त्याने पार्टीसीपेट केले या दोन्ही शोमध्ये त्याला विजेतेपद मिळाले. रिऍलिटी शो गाजवल्यानंतर बिग बॉसच्या घरात विना जगताप शी त्याची ओळख झाली आणि या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. या दोघांनी ‘कसा चंद्र’ ह्या गाण्यात एकत्रित काम केले, नंतर तो ‘शिलावंती’ या म्युझिक व्हिडिओत मीरा जगन्नाथ हिच्यासोबत झळकला. सध्या विना जगताप आणि शिव ठाकरे यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या चर्चा आहेत कारण नुकतेच विना जगतापने शिव ठाकरेचा हातावर गोंदवलेला टॅट्टू काढून टाकला आहे. यावरून त्यांच्यात ब्रेकअप झालं आहे असे बोलले जाते. शिव ठाकरे आणि विना जगताप यांच्यातील ब्रेकअपची चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा ह्या दोघांच्या वाढदिवसाला एकमेकांनी हजेरी लावली नव्हती. दोघांनी आपापले वाढदिवस आपल्या कुटुंबासोबत साजरे केले होते. त्यानंतर ह्या दोघांचे एकत्रित फोटो देखील पाहायला मिळाले नाही त्यावरून हे दोघे वेगळे झाले आहेत असेच म्हटले जाते.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.