पडत्या काळात मराठी सृष्टीला उभारी देण्याचे काम केले ते अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी. त्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव तमाम प्रेक्षक कधीही विसरु शकणार नाहीत हेही तितकेच खरे. आपल्या लाडक्या लक्ष्मीकांत बेर्डेची लेक व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करण्यास उत्सुक आहे. नुकतेच तिने आपल्या या नव्या व्यवसायाबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात तिने आपल्या या व्यवसाबाबत सांगितले आहे.
“Ehaan’s Creation” या नावाने स्वानंदी कपड्यांचा व्यवसाय सुरू करत आहे. स्वानंदी बेर्डे आणि सायली गवळी या दोघींनी एकत्रित येऊन या व्यवसाची सुरुवात करीत आहेत. एक्सकलुझिव्ह साड्या, ड्रेस मटेरिअल्स, दुपट्टा आणि विविध प्रकारचे दागिने असे भरघोस कलेक्शनचा त्यांच्या या व्यवसायात समावेश असणार आहे. याबाबत अधिक माहिती लवकरच देण्यात येईल असे स्वानंदी म्हणते. स्वानंदीची आई प्रिया बेर्डे यांनी देखील हॉटेल व्यवसायात पाऊल टाकले होते. पुण्यातील बावधन येथे त्यांचे ‘चख ले’ या नावाने हॉटेल आहे. तर अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा देखील ‘हंसगामीनी’ या नावाचा साड्यांचा ब्रँड आहे. तेजस्विनी पंडीत आणि अभिज्ञा भावे यांचा देखील ‘तेजाज्ञा’ नावाचा कपड्यांचा ब्रँड आहे. रात्रीस खेळ चाले मालिकेतील अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने देखील अपूर्वाज क्रिएशन नावाने साड्या आणि आर्टिफिशिअल ज्वेलरीचा व्यवसाय सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वीच अपूर्वाने साताऱ्यात देखील हा व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे अभिनय आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात कार्यरत असलेल्या अभिनेत्री म्हणून त्यांची गणना केली जाते.
हे सर्व ब्रँड मराठी सृष्टीत खूपच लोकप्रिय देखील झालेले पाहायला मिळतात. कलाकारांमध्ये हे ब्रँड लोकप्रिय असले तरी त्यांचे चाहते देखील मोठ्या प्रमाणात या ब्रँडची खरेदी करताना दिसतात. स्वानंदी बेर्डे हिच्याकडे प्रेक्षक एक स्टार कीड म्हणून पाहतात. लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांचा अभिनयातला दरारा प्रेक्षकांनी वेगवेगळ्या चित्रपटातून पाहिला होता. त्यामुळे त्यांच्या मुलानी देखील कलाक्षेत्रात नाव कमवावे अशी आशा सगळेच जण बाळगून होते. अभिनय बेर्डे हा मोजक्या चित्रपटातून नायकाची भूमिका बजावताना दिसला. त्याने साकारलेल्या चित्रपटाना प्रेक्षकांनी देखील भरभरून दाद दिली. अभिनय पाठोपाठ स्वानंदी बेर्डेने “धनंजय माने इथेच राहतात का” या नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. हे नाटकही प्रेक्षकांना खूपच आवडले होते. अभिनयाचा तिचा हा प्रवास सुरु असताना ती आता व्यवसाय क्षेत्रात आपला जम बसवू पाहत आहे. तिच्या या नव्या व्यवसायाला भरघोस यश मिळो हीच एक सदिच्छा आणि खूप खूप अभिनंदन!