Breaking News
Home / जरा हटके / पत्र्याच्या झोपडीत बालपण काढलं.. आता आईवडिलांसाठी खरेदी केलं हक्काचं घर
madhuri pawar bharat jadhav
madhuri pawar bharat jadhav

पत्र्याच्या झोपडीत बालपण काढलं.. आता आईवडिलांसाठी खरेदी केलं हक्काचं घर

मराठी सृष्टीतील कलाकारांना चांगले मानधन मिळत नाही हे गणित आता खोडून काढायला हवे. कारण हीच कलाकार मंडळी आता मुंबई सारख्या महागड्या शहरात स्वतःची घरं विकत घेताना पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षात सई ताम्हणकर, मयुरी वाघ, केतकी माटेगावकर, धनश्री काडगावकर, अक्षय केळकर, अमृता उत्तरवार, पृथ्वीक प्रताप, ऋतुजा बागवे या कलाकारांनी त्यांचे घर घेण्याचे स्वप्न सत्यात उतरवले. तर आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अभिनेत्री माधुरी पवारनेही घर खरेदी केल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

madhuri pawar dream come true
madhuri pawar dream come true

माधुरी पवार गेल्या काही दिवसांपासून बऱ्याचशा प्रोजेक्टमध्ये महत्वपूर्ण भूमिकेत झळकताना दिसली आहे. गेल्या वर्षात ती बऱ्याच मालिका, चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तर अनेक मंचावर तिला नृत्याची कला सादर करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे माधुरी पवारची यशस्वी घोडदौड सुरू झालेली आहे. अशातच आता माधुरीने तिच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश करून तीचं घर घेण्याचं स्वप्न साकार केलं आहे. आज ५ जानेवारी रोजी माधुरीने तिच्या या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. तिच्या स्वप्नातल्या घराची झलक तिने एका व्हिडिओतून दाखवली आहे. घराचे इंटेरिअर तिने खूपच विचारपूर्वक केलेले आहे. घराचा मुख्य दरवाजा आकर्षक डिझाईनने सजवलेला पाहायला मिळतो.

madhuri pawar family
madhuri pawar family

तर इंटेरिअरसाठी तिने डार्क चॉकलेटी आणि सफेद रंगांची थीम निवडली आहे. त्यामुळे घराची बैठक व्यवस्था अतिशय प्रशस्त वाटत आहे. माधुरी लहान असल्यापासूनच नृत्याचे धडे गिरवत होती. त्यामुळे इतक्या वर्षात तिने तिच्या नृत्याने अनेक बक्षिसं मिळवली आहेत. ही बक्षिसं तिच्यासाठी खूपच खास आहेत आणि म्हणूनच तिने या बक्षिसांसाठी घराची एक भिंत राखून ठेवलेली पाहायला मिळते. माधुरी पवार ही मूळची साताऱ्याची. माधुरीचे वडील गवंडी काम करायचे. सतत फिरते काम असल्याने माधुरी तिच्या आजीजवळ राहायची. पत्र्याच्या एका छोट्याशा झोपडीत तिने तिचे बालपण घालवले होते. माधुरीला नृत्याची आवड होती, वडिलांनी तिच्या या केलेला प्रोत्साहन दिले. विविध कार्यक्रमात माधुरी तिच्या नृत्याची कला सादर करु लागली.

महाराष्ट्राची लोककला या कार्यक्रमातून माधुरीने प्रसिद्धी मिळवली. पुढे झी युवावरील अप्सरा आली या रिऍलिटी शोची ती विजेती ठरली. तुझ्यात जीव रंगला, देवमाणूस, रानबाजार अशा चित्रपट, मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. आपल्या आईवडिलांसाठी छोटंसं घर घेण्याची तिची इच्छा होती. खूप मोठं नाही पण चार खोल्यांचं आपलं एक घर असावं असे तिने एका मुलाखतीत बोलून दाखवले होते. तीची हीच इच्छा आज पूर्णत्वास आलेली पाहायला मिळते आहे. त्याचमुळे सेलिब्रिटींनी देखील माधुरीचे हे यश पाहून तिचे अभिनंदन केले आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.