Breaking News
Home / जरा हटके / तुझ्या मुलींचा चेहरा लपवते आणि एवढ्या मुलींचे दाखवतेस.. ट्रोलिंगवर क्रांतीचे उत्तर
kranti redkar daughters trollers
kranti redkar daughters trollers

तुझ्या मुलींचा चेहरा लपवते आणि एवढ्या मुलींचे दाखवतेस.. ट्रोलिंगवर क्रांतीचे उत्तर

अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर फारच सक्रिय आहे. तिच्या जुळ्या मुलींचे मजेशीर व्हिडीओ ती कायम सोशल मीडियावर शेअर करत असते. झिया आणि झायदा या क्रांतीच्या जुळ्या मुली आहेत. २०१८ साली या दोघींचा जन्म झाला. दोघी मुली आता शाळेत जाऊ लागल्या आहेत. छबिल आणि गोदो ही त्यांची टोपण नावं आहेत. पण मुलींच्या जन्मापासूनच क्रांती त्यांच्याबाबतीत फारच सिक्युअर आहे. कारण आजवर कधीच क्रांतीने तिच्या या जुळ्या मुलींना मीडियासमोर आणलेले नाही. अर्थात त्यांना जेव्हा मिडियासमोर यावं वाटेल तेव्हा त्या येतील असे तिने म्हटले होते.

actress kranti redkar
actress kranti redkar

नुकत्याच एका व्हिडिओमुळे क्रांती रेडकर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. नवरात्रीचा उत्सव सगळीकडे मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. क्रांतीनेही तिच्या घरी कन्या पूजन साजरे केले होते. तेव्हा काही मुलींना तिने घरी आमंत्रण देऊन त्यांचे पूजन केले होते. या सोहळ्याचा व्हिडिओ क्रांतीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण या व्हिडिओत ती तिच्या मुलींचे चेहरे लपवताना दिसली. तेव्हा नेटकऱ्यांनी क्रांतीला चांगलेच ट्रोल केलेले पाहायला मिळाले. या युजरने क्रांतीला ट्रोल करताना म्हटले की, तू तुझ्या मुलींचे चेहरे लपवतेस आणि इतक्या सगळ्या मुलींचे चेहरे तू दाखवतेस. इतरांच्या मुलींचे चेहरे दाखवण्याचा तुला काय अधिकार आहे? असे म्हणत अनेक नेटकऱ्यांनी तिला या प्रश्नाने भांभावून सोडले.

kranti redkar daughters zia zayada
kranti redkar daughters zia zayada

याच आशयाच्या अनेक कमेंट्स आल्यानंतर क्रांतीने या ट्रोलर्सना उत्तर देण्याचे ठरवले. क्रांती म्हणते की, त्या मुलींचे आईवडीलच हे व्हिडीओ काढत होते पोस्ट करण्यासाठी, तेव्हा काळजी नसावी. पण छबिल आणि गोदोच्या संरक्षणाची जबाबदारी तुम्ही घेणार असाल तर मी त्यांचे चेहरे नक्कीच दाखवेल. किमान या व्हिडिओची भावना तुम्ही समजून घ्यायला हवी. सारखं आपलं तत्त्वज्ञान पाजळू नये. असे म्हणत क्रांतीने नेटकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर देऊन त्यांना तेवढ्यापुरते तरी शांत केलं आहे. क्रांतीचे म्हणणे योग्य आहे आणि नेटकऱ्यांनीही असे प्रश्न विचारणे बंद करावे असे म्हणत तिच्या चाहत्यांनी तिची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.