काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने टोल संदर्भात सरकारच्या विरोधात एक ट्विट केले होते. तेव्हा तिच्या ट्विटरवरची ब्ल्यू टिक हटवण्यात आली होती. यानंतर तेजस्विनी पंडितने सरकार विरोधात बिनधास्तपणे मत मांडल्याने राज ठाकरे यांनी तिचे फोन करून कौतुक केले. राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असायला हवे हे तिचे स्पष्ट मत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तेजस्विनी पंडितने या सर्वांचा खुलासा केलेला पाहायला मिळाला. मराठी इंडस्ट्रीत गटबाजी केली जाते.
यावर तेजस्विनी म्हणते की, मी कुठल्या गटात नव्हतेच कधी. लोक उगाच म्हणतात की संजय जाधवच्या गटात काम करते. ऑफ स्क्रीन आमची खूप चांगली मैत्री आहे. एखाद्या दिग्दर्शकाला एका कलाकारासोबत काम करताना तो त्याचा कम्फर्ट झोन बघत असतो. एखाद्या कलाकाराला तो वारंवार कास्ट करतो याचा अर्थ असा असतो की त्याला माहित आहे की हा अभिनेता त्याच ऐकेल. तो अभिनेता त्याला सहकार्य करेल, बजेटमध्ये बसेल आणि आपले म्हणणे ऐकेल असा विश्वास असतो. तेव्हा तो दिग्दर्शक तशाच अभिनेत्याची निवड करतो. त्यामुळे हा या गटातला तो त्या गटातला अशी गटबाजी पाहायला मिळते. त्याचमुळे तेजस्वीनीचे बऱ्याचदा संजय जाधव सोबत नाव जोडले गेले.
तेजस्विनी म्हणते की, खरं तर गटबाजी कशाला म्हणतात. कारण मी संजय जाधव सोबत केवळ दोनच चित्रपटात काम केलं आहे. माझ्यापेक्षा सईने जास्त काम केलंय पण तरीही माझं नाव त्या गटात टाकण्यात येतं. तू ही रे आणि ये रे ये रे पैसा हे दोनच चित्रपट मी संजय जाधव सोबत केले आहेत. संजय जाधवला मी दादा म्हणते. खरं तर त्याला दादा म्हणते इथंच सगळं संपतं. मला उत्तर द्यायची पण गरज नाहीये. आपल्याला माहीत असतं की समोरची व्यक्ती बाबारूपी किंवा दादारूपी आहे. तिथे आपण कोणाला उत्तरं द्यायची आणि का द्यायची असे म्हणत तेजस्विनीने या अफेअरच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.