चंदेरी दुनियेत टिकून राहायचे असेल तर तुम्ही प्रसिद्ध चेहरा असलं पाहिजे. पण एक प्रसिद्ध चेहरा असूनही जर तुम्हाला काम मिळत नसेल हि खंत तुम्हाला बोलून दाखवावी लागत आहे यासारखं दुर्दैव दुसरं काहीच नसेल. टिकू तलसानिया बॉलिवूड सृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा. विनोदी भूमिकांसाठी हे नाव खूप प्रसिद्ध आहे, पण सध्या आपल्याकडे कामच नाहीये असे स्पष्टपणे त्याला म्हणावे लागत आहे. टिकू तलसानिया सध्या ६९ वर्षांचे आहेत. दरम्यान, त्यांची मुलगी शिखा तलसानिया ही अभिनेत्री म्हणून प्रसिद्धीस आली आहे. शिखा शेवटची सत्यप्रेम की कथा या चित्रपटात दिसली होती.
टिकू तलसानिया रोहित शेट्टीच्या सर्कस चित्रपटात दिसले होते. दिल है की मानता नहीं, कभी हा कभी ना, इश्क यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये टिकू तलसानिया यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत टिकू तलसानिया काम नसल्याचे सांगताना म्हणतात की, ऑडिशन देऊन आणि फीलर्स पाठवूनही त्याला चांगले काम मिळत नाहीत. त्यांनी कामाच्या कमतरतेचे श्रेय बदलत्या युगाला दिले आहे. जिथे बॉलीवूडमध्ये फॉर्म्युला फिल्म्सची जागा कथेवर आधारित सिनेमांनी घेतली आहे. एकेकाळी कॅबरे डान्स, दोन प्रेमगीते असलेले फॉर्म्युला चित्रपट असायचे आणि कॉमेडियन येऊन त्याचे काम करून निघून जायचे तो काळ गेला. ते सर्व आता बदलले आहे. ती कथाभिमुख बनली आहेत.
जोपर्यंत तुम्ही कथेचा एक भाग बनत नाही किंवा ज्याची कथा कथेशी जोडलेली नाही तोपर्यंत अशा व्यक्तीची व्यक्तिरेखा तुम्हाला साकारायला मिळत नाही, तोपर्यंत तुम्हाला काम मिळत नाही. मी सध्या थोडा बेकार आहे. यावर ते स्वतःच हसतात. मला काम करायचे आहे, पण योग्य प्रकारच्या भूमिका माझ्या वाट्याला येत नाहीत. मी घरी निष्क्रिय बसलेलो नाही, परंतु ऑडिशनपासून एजंटद्वारे किंवा निर्मात्यांना फीलर्स पाठवून शक्य तितक्या मार्गांनी कामाचा पाठलाग करतो आहे. मी नियमितपणे काम शोधत असतो. माझ्याकडे एक एजंट आहे, स्क्रिप्ट्स आणि नाटके शोधणारी टीम आहे. काळानुसार गोष्टी बदलल्या आहेत, पण धीर धरायला हवा. मागील काही वर्षांत कामकाजाचे तत्त्व विस्कळीत झाले आहे. आता, लोक चाणाक्ष आणि अधिक प्रगतीशील होत आहेत. लोक मला कॉल करतील याची मी वाट पाहत आहे. त्यामुळे एखादी योग्य भूमिका असेल तर मला ती करायला नक्कीच आवडेल.