Breaking News
Home / जरा हटके / रिमाने माझ्याकडे ती गोष्ट मागितली.. तीने मागितलेली गोष्ट आजही न केल्याची मला खंत
reema lagoo suhasini joshi
reema lagoo suhasini joshi

रिमाने माझ्याकडे ती गोष्ट मागितली.. तीने मागितलेली गोष्ट आजही न केल्याची मला खंत

बॉलिवूडची ग्लॅमरस आई म्हणून रिमा लागू यांच्याकडे पाहिले जाते. रिमा लागू यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत आईच्या भूमिका विशेष करून गाजवल्या होत्या. दुर्दैवाने रिमा लागू यांचे २०१७ मध्ये हृदयविकाराने दुःखद निधन झाले. मराठी इंडस्ट्रीतील सुहास जोशी यांच्याशी रिमा लागू यांची खूप घनिष्ठ अशी मैत्री होती. सुहास जोशी यांनी एका मुलाखतीत रिमा लागू यांच्या मैत्रीचा एक किस्सा सांगितला होता. त्यांची ही मुलाखत सध्या खूप व्हायरल होत आहे. या मुलाखतीत सुहास जोशी यांनी रिमा लागून यांनी एक गोष्ट मागितल्याचे सांगतात.

actress reema lagoo
actress reema lagoo

पण रीमा लागू यांनी मागितलेली ती गोष्ट साहस देऊ शकल्या नाहीत ही खंत त्यांनी बोलून दाखवली. सुहास जोशी यांची ही खंत नेमकी काय होती ते जाणून घेऊयात. एक दिवस रिमा लागू आणि स्वाती सुहास जोशींच्या घरी राहायला गेल्या. त्या रात्री भरपूर गप्पा गोष्टी रंगल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी रिमा लागू यांनी आवडीची ज्वारीची उकड खाण्याची इच्छा व्यक्त केली. सुहास जोशी यांनी लगेचच हो करते म्हणत होकार दिला. पण नेमके त्याच दिवशी सुहास जोशी यांच्याकडचे ज्वारीचे पीठ संपलेले होते. मी खूप ऐकलंय सगळ्यांकडून पण कधी खाल्ली नाही असे त्या म्हणताच, पुन्हा तू आली की ज्वारीची उकड नक्की करून खाऊ घालेल.

aathavani suhas joshi movie
aathavani suhas joshi movie

पण त्यासाठी तुला परत घरी राहायला यावं लागेल असे आश्वासन सुहास जोशी यांनी रिमा लागू यांना दिले होते. पण त्यानंतर मात्र काही वर्षांतच रिमा लागू यांचे निधन झाले. या मधल्या काळात तिचे माझ्याकडे येणेही झाले नव्हते. ही खंत आजही मनात आहे की तिने मागितलेली ज्वारीची उकड मी तिला देऊ शकले नाही. आजही मी कधी ज्वारीची उकड बनवते तेव्हा तिच्यासाठी घास म्हणून मी तीच्या आठवणीत ती उकड खाते. आपल्या घनिष्ठ मैत्रिणीची इच्छा पूर्ण करू शकले नसल्याची सल अभिनेत्री सुहास जोशी यांना आजही सतावत आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.